डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'यशवंत ' मध्ये विशेष व्याख्यानाचे आयोजन*

 



नांदेड:(दि.४ डिसेंबर २०२३)


           भारतीय संविधानाचे शिल्पकार बोधिसत्व महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन व कार्य युवकांसाठी प्रेरणादायी असून समतामुलक भारतीय समाजाच्या निर्मितीसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करण्याच्या उद्देशाने श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात यशवंत प्रबोधन व्याख्यानमालेअंतर्गत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दलितेतर समाजासाठीचे कार्य' या विषयावर महाविद्यालयाचे प्राचार्य तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शन व अध्यक्षतेखाली दि.६ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी १२:३० वाजता इंग्रजी भाषा प्रयोगशाळा येथे डॉ.आर.डी.शिंदे, राज्यशास्त्र विभागप्रमुख, लोकमान्य महाविद्यालय, सोनखेड यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. 

          या व्याख्यानाचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन यशवंत प्रबोधन व्याख्यानमाला समितीच्या वतीने प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे, उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे, समन्वयक डॉ.संदीप पाईकराव, प्रा.गौतम दुथडे, डॉ.मीरा फड, डॉ.ज्ञानेश्वर पुपलवाड, ग्रंथपाल डॉ.कैलास वडजे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयिका डॉ.एल.व्ही.पदमारानी राव, प्रसिद्धीप्रमुख डॉ.अजय गव्हाणे, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, कार्यालयीन अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील आदींनी केले आहे.

टिप्पण्या