शैक्षणिक क्षेत्रात उललेखनीय कार्य केल्या बद्दल सारनाथ सौंदडकर डॉक्टरेट मानद उपाधीने सन्मान.

 

नांदेड
दी. 06/11/23
दशमेश प्लाझा सेक्टर 20 बी ,फरिदाबाद हरियाना कॅस्टले मॅजिक थिएटर येथे  दिनांक 03/11/2023 रोजी आयोजित केलेल्या कार्यक्रमात *नांदेड चे सुपुत्र के. बी.ॲबॅकस चे डायरेक्टर सारनाथ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था चे अध्यक्ष सारनाथ सौंदडकर यांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थी व पालकांसोबत च्या कार्य शैलिबद्दल मॅजीक बुक ऑफ द रेकॉर्ड युनिव्हर्सिटी यांच्या तर्फे "हॉनोरोरी डॉक्टरेट" अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले.* 
अशी महिती देताना डॉ. सारनाथ सौंदडकर यांनी सांगितले की मागील एकवीस वर्षापासून लहान विद्यार्थ्यांना शिकवताना, पालकांना समजून सांगताना येणाऱ्या अडचणी यावर विशेष संशोधन करून काळानुरूप शिक्षण प्रणाली विकसित केली. त्यामुळेच माझे विद्यार्थी जगाच्या पाठीवर बावीस देशातून शिकत आहेत. 
उल्लेखनीय बाब ही आहे की, सारनाथ सौंदडकर हे अतिशय संघर्षमय जीवन, प्रतिकूल परिस्थतीतून आल्यामुळे सर्वस्तरातील पालक व विद्यार्थ्यांची जान आहे .
कार्यक्रमाचे मुख्य अतिथी *डॉ. मनोज भाटिया सिने अभिनेता,दिल्ली यांनी डॉ. सारनाथ सौंदडकर यांनी ॲबॅकस सारख्या जागतिक स्तरावरील शिक्षण प्रणालीत मोलाचे योगदान देऊन; सहज आणि सोप्या पद्धतीचा अभ्यासक्रम विकसित केला त्याबद्दल त्यांनी नांदेड महाराष्ट्र सोबतच भारताची शान जगात वाढवली आहे .* 
या प्रसंगी हरियाना प्रांताचे प्रख्यात पत्रकार तथा समाज सेवक डॉ .मनजितसिंह दहिया , रेक्की मास्टर डॉ .मोनिका अगरवाल नवी दिल्ली, डॉ. बद्रिनारायान अधिकारी कोलकोत्ता यांच्यासह अनेक गणमान्य व्यक्तींना डॉक्टरेट मानद पदवी देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी डॉ. विजयकुमार गनगल्ला प्रसिद्ध तेलगू अभिनेता तथा डायरेक्टर , मॅजीक बुक ऑफ द रिकॉर्ड यूनिवर्सिटी चे डायरेक्टर प्रसिद्ध जादूगर डॉ. सी. पी. यादव यांच्या हस्ते प्रमाणपत्र, मेडल, ट्रॉफी देऊन दीक्षांत समारंभ संपन्न झाला.
डॉ. सारनाथ सौंदडकर यांनी प्राप्त केलेल्या *डॉक्टरेट मानद पदवी* बद्दल  *प्रा. आशिष नाग्ला, प्रा. शीला सौंदडकर, प्रा. स्मिता ढवळे प्रा. जयभीम ढवळे, इंजी. सुमित सौंदडकर, प्रा. सुजाता सौंदडकर, प्रल्हाद सवंगडे,भीमराव कांबळे ,पवन अवचार,संतोष सौंदडकर, संतोष सवंगडे, , सुभाष कोसरे, नितीन चव्हाण , कारूना हटकरे, इंजि. उदय हाटकरे* आदींनी अभिनंदन केले.
टिप्पण्या