लातूर, दि. ५ - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रकाश महानवर यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरुपदाचा कार्यभार दि. ६ नोव्हेंबर रोजी स्विकारला असता, येथील राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलाच्यावतीने संकुलाचे सचिव प्राचार्य डी. एन. केंद्रे यांनी त्यांचे स्वागत केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. उध्दव भोसले यांचा कार्यकाळ ५ नोव्हेंबर रोजी संपला आहे. त्यामुळे राज्यपाल तथा सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती रमेश बैस यांनी या विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. महानवर यांची नियुक्ती केली आहे. पुढील सहा महिने अथवा नवीन कुलगुरुंची नियुक्ती होईपर्यंत डॉ. महानवर हे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा पदभार पाहतील, असे आदेशात म्हटले आहे. सोमवारी सकाळी ११.३० वाजता डॉ. महानवर यांनी कार्यभार स्विकारला असता, राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलाच्यावतीने प्राचार्य डी. एन. केंद्रे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. दरम्यान, कुलपती रमेश बैस यांनी दिलेली जबाबदारी निश्चितच समर्थपणे पार पाडेन, असा विश्वास डॉ. महानवर यांनी व्यक्त केला आहे.
addComments
टिप्पणी पोस्ट करा