भारत सरकार शिष्यवृत्तीची प्रलंबित रक्कम तात्काळ नांदेड जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळावी

 नांदेड प्रतिनिधि:

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना आणि भारत सरकार शिष्यवृत्तीची प्रलंबित रक्कम तात्काळ नांदेड जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी फुले शाळा आंबेडकर विद्यार्थी कृती समिती द्वारे माननीय आमदार बालाजी यांना निवेदन देण्यात आले आहे निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र शासनातर्फे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळत असते या योजनेपासून नांदेड जिल्ह्यातील तब्बल आठ हजार विद्यार्थी वंचित आहेत त्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होत आहे त्यांना अनेक संकटाचा सामना करून शिक्षण घ्यावं लागत आहे आणि हा मुद्दा राज्याचे मुख्यमंत्री सामाजिक न्याय मंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या निदर्शनास आणून देऊन नांदेड जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी अशोक गायकवाड,जी. एस.गायकवाड, नारायण सरोदे,संभाजी चिखलीकर व फुले शाहू आंबेडकर विद्यार्थी कृती समितीचे सदस्य उपस्थित

टिप्पण्या