स्वारातीम’ विद्यापीठाचे कुलगुरू व प्र-कुलगुरू यांचा निरोप समारंभ आज
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले व प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांचा कार्यकाळ दि. ०५ नोव्हेंबर रोजी पूर्ण होत आहे. यानिमित्त त्यांचा दि. ०४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११:३० वा. विद्यापीठाच्या दीक्षान्त मंचावर निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांचा ५ वर्षाचा कार्यकाळ दि. ५ नोव्हेंबर २०२३ रोजी पूर्ण होत आहे. कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी दि. ०५ नोव्हेंबर २०१८ रोजी विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून पदभार स्वीकारला होता. त्याचबरोबर त्यांच्या समवेत विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांचाही कार्यकाळ दि. ५ नोव्हेंबर २०२३ रोजी पूर्ण होत आहे.    

टिप्पण्या