कंधारच्या रानमेव्यावर मंदीचे सावट;पावसाअभावी उत्पन्नामध्ये घट ३० ते ३५ सीताफळाची एक डाल ५००रु.च्या वर गेली

कंधार ()

   बाजारात कंधारचा रान मेवा दाखल झाला आहे. या रानमेव्याकडे बघताच ग्राहक आकर्षित होत आहेत. बाजारात तुरळक ठिकाणीच सीताफळ बघायला मिळत आहे.कंधार तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या रानमेव्यावर मंदीचे सावट असून यंदाच्या पावसाअभावी उत्पन्नामध्ये मोठी घट झाली असून ३० ते ३५ सीताफळाच्या एका डालीचा भाव ५०० रु.वर गेली.  
       सवाशे ग्रॅम ते अडीचशे ग्रॅमच्या आसपास म्हणजेच पावकिलोच्यावर वजन असलेल्या सीताफळ जातीच्या रान मेवा हंगाम सुरू झाला आहे. दिसायला मोठा असल्याकारणाने ग्राहक सीताफळाकडे बघून आकर्षित होत आहेत. यामध्ये बिया तसेच चवीला गोड असल्याने याची ग्राहकांकडून मागणी होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. परिसरात म्हणावी तशी शेती नसून सुपीक जमीन आहे. परिसरात पाऊस जरी कमी प्रमाणात झाल्याने रानमेवा रानमेव्याची घट झाली तर बाजारात कमी आल्याने भाव गगनाला गेला आहे.
           या सीताफळाचे प्रमाण कंधार,मुखेड परिसरातील डोंगराळभागावर वसलेला असून या परिसरात अनेक रानमेव्याची  लागवड आहे. तेथून संपूर्ण महाराष्ट्र भर हा रानमेवा पुरवला जातो.महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कंधारचा रानमेवा प्रसिद्ध आहे.गऊळ,हरबळ मुखेडफ़ाटा, किरोडा, घोडज, पानभोसी, संगुचीवाडी, अंबुलगा, शिराढोण, गोलेगाव,फुलवळ,कंधारेवाडी,पानशेवडी,बाचोटी,शेकापूर,नागलगाव,कुरुळा वाडितांडे यासारख्या अनेक शिवारात सीताफळ आढळून येतात. विशेष या रानमेव्याची लागवड करायची गरज नाही.दर वर्षी निसर्ग लाजवेल अशा प्रकारे माळरानावर झुडपेच्या झुडपे व लागलेली गोड फळे फुलून दिसतात तर यावर्षी पावसाळा कमीप्रमाणत असल्यामुळे या मेव्याची अवाक कमी प्रमाणात बाजारात दिसत आहे.
       या परिसरात बिनलागवडीचा व्यवसाय असून शिवारातच कृत्रिम पद्धतीने पिकवले जातात अन बाजारात विक्रीसाठी आणले जातात.परिसरातील कुटुंब दररोज पहाटे शिवारातून शहरात येतात आणि विक्रीसाठी सकाळी सकाळी बाजारात आणतात.मिळालेल्या पैशात आपला उदरनिर्वाह चालवतात.हा रानमेवा खाण्यास चविस्ट असल्यामुळे मोठ्याप्रमाणात मागणी होत आहे. अनेक मोठ्या छोट्या शहरासह परदेशात हा किलोने व नगावरही विकला जात आहे. 

टिप्पण्या