गोदी कामगारांच्या पगारवाढीबाबत दिल्लीत फलदायी चर्चा

भारतातील प्रमुख बंदरातील बंदर व गोदी कामगारांच्या पगारवाढीबाबत ६ नोव्हेंबर २०२३ रोजी दिल्लीमध्ये द्विपक्षीय वेतन समितीच्या मिटिंगमध्ये फलदायी चर्चा झाली. 

 सदर मिटिंगमध्ये पूर्वीचे इतर करार आणि पेन्शन याबाबत व्यवस्थापनाने नेमलेल्या समितीमध्ये प्रत्येक फेडरेशनचा एक प्रतिनिधी घेण्याचे मान्य करण्यात आले असून लवकरच मिटिंग घेण्याचे मान्य करण्यात आले. १ जानेवारी २०२२ पासून लागू होणाऱ्या वेतन कराराचा कालावधी पाच वर्षाचा असेल.

बढतीच्या वेळेस आता असलेली वेतन निश्चिती अस्तित्वात असलेल्या प्रथेप्रमाणे राहील.

 घर भाडेभत्ता ( H R A ) आता अस्तित्वात असलेल्या प्रथेप्रमाणे प्रमाणे राहील. प्रवास भत्ता ( T R ) 

११०० रुपयावरून १५०० रुपये करण्याचा निर्णय झाला. त्यावर महागाई भत्ता (D A ) मिळेल.

 धुलाई भत्ता ( W A ) १९४ रुपयावरून २४० रूपये व २५० रुपयावरून ३०० रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला. एल टी सी ( L T C ) आता अस्तित्वात असलेल्या प्रथेप्रमाणे मिळेल. ओव्हर टाईम, नाईट वेटेज, हार्ड शिप अलाउन्स, प्रोटेक्शन क्लाज याबाबत आयपीए ड्राफ्ट देणार असल्याचे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

   सुधारित वेतन श्रेणी, वार्षिक पगार वाढीचा दर, फीटमेंट ऑफ पे, महागाई भत्ता, ऑप्शन ऑन पे फिक्सेशन, पगार वाढीची थकबाकी या महत्त्वाच्या मागण्यावर अद्याप चर्चा होणे बाकी आहे. पगारवाढीबाबत पुढील मिटिंग एक महिन्यात घेण्याचे मान्य करण्यात आले.

दिल्लीमध्ये झालेल्या द्विपक्षीय वेतन समितीच्या मिटींगला ऑल इंडिया पोर्ट अँड डॉक वर्कर्स फेडरेशन (वर्कर्स ) चे नेते सुधाकर अपराज, विद्याधर राणे, असीम सूत्रधारसह इतर फेडरेशनचे नेते उपस्थित होते.

आपला 

मारुती विश्वासराव 

प्रसिद्धीप्रमुख

 मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन



टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
सेलूतील नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विमानवारी उत्तरभारत सहलीद्वारे गिरवले शिस्त, स्वावलंबनाचे धडे
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज
हैदराबादच्या भारतीय कला महोत्सवात डॉ. सुरेश सावंत यांची प्रकट मुलाखत
इमेज