भारतातील जहाजावरील नाविक कामगारांचा ६ नोव्हेंबरला दरवर्षी एकता दिन साजरा केला जातो. त्याप्रमाणे नॅशनल युनियन ऑफ सिफेरर्स ऑफ इंडिया या कामगार संघटनेच्या वतीने मस्जिद बंदर येथील सिमेंनस् हॉस्टेलच्या आगाशीवर नाविक कामगारांचा एकता दिन संपन्न झाला.
भारत सरकारचे डायरेक्टर जनरल शिपिंग श्री. श्याम जगन्नाथन यांनी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शनपर भाषण करताना सांगितले की, आपली एकजूट कायम ठेवा, एकजुटीमुळे आपले प्रश्न सुटतील. देशसेवा देखील होईल. कामगारांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाईल. जहाजावर असताना आपण कुटुंबापासून लांब असता, त्यामुळे आपल्याला आरोग्य, वैद्यकीय इतर कोणतेही प्रश्न असतील तर आपण आमच्या हेल्पलाइनशी संपर्क साधावा आपणास सहकार्य केले जाईल.
नुसीचे जनरल सेक्रेटरी श्री. मिलिंद कांदळगावकर यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात सर्वांचे स्वागत करून, आज नाविक एकता दिनानिमित्त नाविकांचे कुटुंबिय मोठ्या संख्येने उपस्थित आहेत,नाविकांच्या हितासाठी नुसिने अनेक कामगार कल्याणकारी योजना राबविल्या आहेत, त्याचा नाविकांनी फायदा घ्यावा. याप्रसंगी मासाचे कॅप्टन गिरीश फडणीस, इनसाचे कॅप्टन फिलीप मॅथ्यू, इकसा असोसिएशनचे सेक्रेटरी कॅप्टन राकेश सिंग, एम. यु. आय. चे कॅप्टन तुषार प्रधान यांची नाविकांचे हित, मालकांचे हित, नाविकांची सुरक्षा, नोकर भरतीसाठी असणारी दलालगिरी या प्रमुख विषयांवर मार्गदर्शनपर भाषणे झाली. सभेचे सुंदर सूत्रसंचालन नुसीचे सल्लागार अब्दुलगनि सेरंग यांनी केले. नाविक कामगारांच्या मुलांचे गुणगौरव उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन असिस्टंट जनरल सेक्रेटरी सुनील नायर यांनी केले, तर आभार उपाध्यक्ष लुईस गोम्स यांनी मानले. मनोरंजन म्हणून हिंदी वाद्यवृद्ध कार्यक्रम झाला. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
आपला
मारुती विश्वासराव
addComments
टिप्पणी पोस्ट करा