पोदार इंटरनॅशनल स्कूल नांदेड तर्फे सुमन मुलींचे वसतिगृह तसेच मातोश्री वृद्धआश्रम व स्नेह सिटिझन होम असोला,परभणी येथील गरजूसाठी डोनेशन ड्राइव्ह उपक्रम राबवला.या उपक्रमाअंतर्गत विविध सामुग्रीचे वाटप करण्यात आले.पोदार इंटरनॅशनल स्कूल नांदेडच्या प्राचार्या डॉ.मालिनी सेन व उपप्राचार्य मा.श्री. अजय फरांदे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रेरणेतून पहिली ते पाचवीच्या मुलांनी दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या वस्तू म्हणजे गहू,तांदूळ,मुगडाळ,तूरडाळ, बटाटे,कांदे अशा जीवनावश्यक वस्तू जमा केल्या.तर सहावी ते आठवीच्या मुलांनी साबण,शाम्पू,हेयर ऑईल,टॉवेल,कोल्ड क्रीम,मेणबत्या तर नववी व दहावीच्या विद्यार्थ्यानी कडधान्ये व बिस्कीट, एकत्रित करून सुमन मुलींचे वसतिगृह तसेच मातोश्री वृद्धआश्रम व स्नेह सिटिझन होम असोला,परभणी येथील गरजूना शाळेच्या प्राचार्या डॉ.मालिनी सेन व शाळेचे उपप्राचार्य मा.श्री.अजय फरांदे यांच्या हस्ते या वस्तूंचे वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांना त्यागाचे, दानाचे महत्व कळावे आणि सामाजिक बांधिलकीची भावना दृढ व्हावी ही या उपक्रमाची मुख्य परिभाषा आहे तसेच विद्यार्थी एक सुजाण आणि संवेदनशील नागरिक घडावा आणि त्याने समाज ऋण फेडण्याचा आपल्या परीने प्रयत्न करावा याचा वस्तुपाठ अशा उपक्रमातून प्रत्यक्षपणे देण्यात असे उपक्रम सहाय्यभूत ठरतात असे विचार शाळेचे उपप्राचार्य मा.श्री. अजय फरांदे यांनी मांडले.
या उपक्रमात शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांनी उस्फूर्त सहभाग नोंदवत या सामाजिक बांधिलकीच्या कार्यास आपला हातभार लावला.
शाळा ही समाजाची प्रतिकृती आहे.शाळा ही समाजाला जशी दिशा देते तशीच समाजाची दशा परिवर्तित करण्यातही मोलाचे योगदान देते.विद्यार्थी दशेतच मुलांच्या सामाजिक संवेदना व समाजिक भान तरल करण्यासाठी असे उपक्रम प्रेरक व दिशादर्शक ठरतात.आणि या मुली ज्या आज निराधार व अनाथ आहेत त्या इतक्या सक्षम व्हाव्यात की त्यांनीही असाच दातृत्व गुण घेऊन भविष्यात अशाच निराधारांचे , अनाथांचे आधारभूत म्हणून कार्य करावे.असे शाळेच्या प्राचार्या डॉ.मालिनी सेन यांनी आपले विचार व्यक्त करून शाळेचे पालक,विद्यार्थी, व समस्त शिक्षकांचे आभार मानले. यावेळी त्यांनी सर्व विद्यार्थी आणि पालक यांचे मनापासून आभार मानले.
या प्रसंगी शाळेचे व्यस्थापक श्री हरिदास रेड्डी, गोविंदसाई मकवाना,कार्यक्रम समन्वयक गुरुदीपसिंग, उच्च माध्यमिक समन्वयक जगन्नाथ ढेरे,माध्यमिक समन्वयिका रीना नायर, प्राथमिक समन्वयिका मिनाक्षी अय्यर तसेच शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
addComments
टिप्पणी पोस्ट करा