६ पुर्नवसित गावांच्या सर्वांगीण विकासाकरिता 11 कोटी 60 लाख रुपयांचा निधी मंजूर - खासदार हेमंत पाटील यांची माहिती

नांदेड, दि.04 (प्रतिनिधी) : हदगाव - हिमायतनगर विधानसभा क्षेत्रातील पैनगंगा व कयाधू नदी पात्राच्या काठावरील ६ गावांना नेहमीच पुराच्या पाण्याचा फटका बसत होता. पुराच्या पाण्यापासून संरक्षण व्हावे म्हणून गावांचे सुरक्षित ठिकाणी पुर्नवसन करण्यात आले खरे परंतु ही गावे विकासापासून वंचित होती. खासदार हेमंत पाटील यांनी या ६ गावांच्या सर्वांगिण विकासासाठी पुढाकार घेऊन निधी उपलब्ध करुन दिला असून, या पुर्नवसित गावांचा सर्वांगिण विकासाकरिता राज्य शासनाकडुन ११ कोटी ६० लाख रुपयाचा निधी प्राप्त झाला असून, या गावांचा सर्वांगिण विकास केला जाईल अशी माहिती खासदार हेमंत पाटील यांनी दिली.

पावसाळा आला कीबनचिंचोलीरावणगावचेंडकापूरआडाभानेगावगुरफळी या गावातील ग्रामस्थांच्या मनात पुराच्या पाण्याची नेहमी भिती असायचीम्हणून या गावांचे पुर्नवसन करण्यात आले. पण या गावात म्हणावे तशी विकास कामे झाली नव्हती. म्हणून खासदार हेमंत पाटील यांनी या पूर्नवसित गावांच्या विकासाकरिता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मदत व पुर्नवसन मंत्री अनिल पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून ११ कोटी ६० लाख रुपयांचा निधी खेचुन आणला आहे.

यावेळी माहिती देताना खासदार हेमंत पाटील म्हणाले कीबनचिंचोलीरावणगावचेंडकापूरआडाभानेगावगुरफळी या पुर्नवसित गावांना पुरेशा नागरी सुविधा मिळत नव्हत्या. गावातील नागरिकांना सुविधा मिळाव्यात या हेतूने प्रधान सचिव (मदत व पुर्नवसन) यांच्यासह मंत्री यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. शासन स्तरावर या सर्व गावांच्या विकास कामांना मंजुरी मिळाल्याने या गावात आता मोठा प्रमाणावर विकास कामे केली जाणार आहेत. या विकास निधीतून गावातील अंतर्गत रस्तेशाळेला संरक्षण भिंतनाली बांधकामसमाज मंदिर यासारख्या नागरी सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील असे खासदार हेमंत पाटील यांनी सांगितले.


टिप्पण्या