नांदेड:( दि.४ नोव्हेंबर २०२३)
श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील कॉमन इन्स्ट्रुमेंटेशन सेंटरतर्फे प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार दि.२९ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान तीन दिवसीय विविध उपकरणे हाताळण्याची कार्यशाळा संभाजी फार्मसी कॉलेज, खडकुत येथील बी.फार्मसी विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती.
कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी उपप्राचार्य डॉ.हरिश्चंद्र पतंगे, कॉमन इन्स्ट्रुमेंटेशन सेंटरचे समन्वयक डॉ.संभाजी वर्ताळे, डॉ.दत्ता कवळे, तंत्रज्ञ प्रसन्नजीत पवार, तसेच संभाजी फार्मसी कॉलेजचे प्रा.सोनटक्के, प्रा.मामडे व विद्यार्थी उपस्थित होते.
प्रारंभी प्रास्ताविक डॉ.संभाजी वर्ताळे यांनी केले. आपल्या प्रास्ताविकातून इन्स्ट्रुमेंटल सेंटरमध्ये अद्ययावत कोणकोणती उपकरणे उपलब्ध आहेत, व त्यांचा होणारा उपयोग तसेच या कार्यशाळेचा आपल्या जीवनात विविध क्षेत्रात नोकरी मिळविण्यासाठी आणि संशोधन क्षेत्रात होणारा उपयोग याबद्दल सविस्तर माहिती दिली.
अध्यक्षिय समारोपात उपप्राचार्य डॉ.हरिश्चंद्र पतंगे यांनी, महाविद्यालयात चालणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली आणि यशवंत महाविद्यालय कशाप्रकारे आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अनेक उपक्रमात समाविष्ट करून साधनसामग्रीचा वापर करून घेते; याबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ.महेश कलंबकर, डॉ.विजय भोसले, डॉ.सुभाष जुन्ने,डॉ.संदीप खानसोळे, डॉ.शिवराज शिरसाट, डॉ.कविता केंद्रे, डॉ.कुवर, डॉ.कवळे, डॉ.मदन अंभोरे, प्रा.राऊत, प्रा.निलेश चव्हाण, प्रा.मावसकर, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, अधिक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील आणि डॉ.अजय गव्हाणे यांनी सहकार्य केले
addComments
टिप्पणी पोस्ट करा