सचिन अहिर यांच्या प्रयत्नाने गुजरात मधील पेपर मिलच्या कामगारांना २२ हजार रुपये भरघोस बोनस!*





     मुंबई दि.९: गुजरात मधील सोनगड येथील जे.के.पेपर मिलच्या कामगारांना अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाने या वर्षिचा प्रत्येकी कमाल २२,३१५ आणि किमान २०,१२० रुपये बोनस मिळवून देण्यात यश मिळविले आहे. कामगारांनी या‌ बोनसचे उत्स्फूर्त स्वागत केले आहे.

      सन २०२३च्या बोनस करारावर आमदार सचिन अहिर,विद्यमान सरचिटणीस,यांच्यासह,युनियनचे स्थानिक अध्यक्ष किसनभाई गामित,उपाध्यक्ष समाधान पाटील आणि युनिट प्रमुख उपाध्यक्ष सुनिल अहिर (लालीभाऊ)आदींनी युनियनच्या वतीने तर व्यवस्थापनाच्या वतीने कंपनीचे उपाध्यक्ष मुकूल वर्मा,महाव्यवस्थापक प्रशान्त वैद्य यांनी स्वाक्षऱ्या केल्या.युनियनचे‌ उपाध्यक्ष,राजेशभाई गामीत आणि पदाधिकारी श्रीराम माहाजन,अतुल खाचणे,तसेच

खजिनदार भंवरसिग शेखावत यांनी बोनस वाटाघाटीत भाग घेतला.

    झेरॉक्स पेपर आणि विविध मल्टी वापरासाठी बोर्ड पेपर उत्पादन करणाऱ्या या पेपर मिल मध्ये जवळपास ८८५ कामगार काम करतात. महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे हे‌ युनियन स्थापनेचे अवघे चौथे वर्ष आहे.युनियनने मागील पगारवाढही भरघोस मिळवून देऊन,कामगारांच्या कष्टाला योग्य न्याय मिळवून दिला आहे.

जे‌‌.के.पेपर मिलच्या कामगारांना दिवाळी पूर्वी नुकतेच‌ बोनसचे वाटप झाले आहे .युनियनचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी या भरघोस बोनसवाढीच्या कराराचे स्वागत केले आहे.•••••

टिप्पण्या