*केंद्रीय मंत्री गडकरींनी दिलेल्या शंभरफुटाचा रस्ता अवैध प्रवाशी वाहतूक दारांनी व्यापला* संबंधितांचे अक्षम्य दुर्लक्ष


 माहुर (प्रतिनिधी)केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी तिर्थक्षेत्र माहुर या प्रख्यात तीर्थक्षेत्राला चारीबाजूने महामार्गाशी जोडले आहे.एवढ्यावरच न थांबता शहरातील दत्तचौक ( टी पॉइंट) ते ग्रामीण रुग्णालयापर्यंत शंभर फुटाचा भव्य सि. सी.रोडचीही त्यांनी निर्मिती करून दिली आहे.असे असलेतरी रहदारीचा हा रस्ता अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या तसेच फेरीवाल्यांच्या विळख्यात सापडला आहे.परंतु महामार्ग प्रबंधन( विशेष प्रकल्प),नगर प्रशासन व पोलिस प्रशासनाचे त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने एखादवेळी मोठा अनर्थ घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

      सण,उत्सव व यात्रा काळात खरेदी विक्री करण्याच्या निमित्ताने दुरून येणाऱ्या भाविकांसह तालुक्यातून येणाऱ्या ग्राहकांची मोठी येथे मोठी गर्दी होते.दर सोमवारला बाजारचा दिवस असल्याने गर्दीत मोठी वाढ होते.अशा गजबजलेल्या भागात अवैध वाहतूक करणारी वाहने,फेरीवाले,हातगाडीवाले व किरकोळ व्यवसाय करणारे व्यापारी महामार्गावरच ठाण मांडून असतात.त्यामुळे रस्ताच शिल्लक उरत नसल्याने अबालवृद्धासह महिलांना अडथळ्याची शर्यत पार करावी लागत आहे.त्यातून त्यांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.त्याला केवळ वसूल केली जाणारी बाजार ड्युटी कारणीभूत असल्याची व्यथा अनेकांनी बोलून दाखविली आहे.*महामार्गावरच दुकाने थाटल्याने व उभी असलेल्या वाहनाने प्रवाशांना बस स्थानकात येण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे, त्यासंदर्भात पोलिसांना अनेकदा लिखित स्वरूपात कळविले आहे,परंतु अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही.* विश्वनाथ चीबडे आगार व्यवस्थापक माहूर

टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
सेलूतील नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विमानवारी उत्तरभारत सहलीद्वारे गिरवले शिस्त, स्वावलंबनाचे धडे
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज
हैदराबादच्या भारतीय कला महोत्सवात डॉ. सुरेश सावंत यांची प्रकट मुलाखत
इमेज