लातूर जिल्ह्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरु* *6 मोडीलिपी तज्ञ आणि उर्दू तज्ञ यांच्याकडून लिप्यांतर करण्याचे काम सुरु*

 

*निवासी उपजिल्हाधिकारी यांनी केली कामकाजाची पाहणी*

लातूर दि.4 ( जिमाका ) लातूर जिल्ह्यातील दहा तालुक्यातील कुणबी नोंदी तपासण्यासाठी  जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी आदेश दिले असून सहा मोडी लिपी आणि उर्दू लिपी तज्ञ यांच्याकडून लिप्यांतर करण्याचे काम सुरु असून आज निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांनी या कामकाजाची पाहणी करून भूमीअभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांना सर्व काम अत्यंत काटेकोरपणे करण्याच्या सूचना केल्या.
  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील सर्व जुन्या नोंदी ज्या बहुतांशी मोडी लिपीत आहेत. काही प्रमाणात उर्दू लिपीत आहेत त्या सर्व नोंदीचे लिप्यांतर करण्याचे काम जिल्ह्यातील दहाही तालुक्यात सुरु आहे. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी संबधित अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन या कामाला प्राधान्य देऊन करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सुट्टीच्या दिवशीही हे काम सुरु आहे अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांनी दिली
टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
सेलूतील नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विमानवारी उत्तरभारत सहलीद्वारे गिरवले शिस्त, स्वावलंबनाचे धडे
इमेज
वंशावळीच्या प्राचीन सरीतून' : अपरिहार्यपणे अवतरलेली भेदक कविता डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज