नाहीतर एनटीसी चाळीतील भाडेकरू रस्त्यावर उतरतील ! सचिन अहिर*


     मुंबई दि.९:मुंबईतील धोकादायक ११ एन.टी.सी.गि‍रण्यांच्या चाळींचे ताबडतोबीने पुनर्वसन झाले पाहिजे,नाहीतर एनटीसी चाळीतील कामगार रस्त्यावर उतरून आंदोलन छेडतील,असा इशारा राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर यांनी चाळ भाडेकरूंच्या सभेत बोलताना दिला.

    मुंबईतील अत्यंत धोकादायक स्थितीत रहाणा-या भाडेकरू काम गारांची सभा परेलच्या मजदूर मंझील मध्ये पार पडली. त्यावेळी

भाडेकरूंपुढे आमदार सचिनभाऊ अहिर बोलत होते.सरचिटणीस गोविंदराव मोहिते,माजी नगरसेवक सुनील मोरे,खजिनदार निवृत्ती देसाई,उपाध्यक्ष आण्णा शिर्सेकर, सुनिल बोरकर,भाऊसाहेब आंग्रे, किरण गावडे आदी उपस्थित होते.

  ‌ एनटीसी गिरण्यांच्या चाळींच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव एनटीसी विभागीय कार्यालयाने म्हाडाकडे पाठविला आहे.म्हाडाने हा प्रस्ताव अभियंत्यांशी‌‌ चर्चा करून राज्य सरकारकडे पाठविला आहे. तरीही हा प्रश्न लवकरच मार्गी नाही लागला तर कामगार रस्त्यावर उतरतील, असे सचिन अहिर यांनी कामगारांच्या सभेत बोलताना सांगितले. 

   एनटीसी गिरण्यांच्या चाळीतील कामगारांना ४०५ चौ.फु.ऐवजी आता ५०० चौ.मी.क्षेत्रफळाची घरे मिळाली पाहिजेत आणि तीही लवकरच मिळाली पाहिजेत,असे गोविंदराव मोहिते यांनी सांगितले.या प्रसंगी भाऊसाहेब आंग्रे, सुनिल मोरे आदींची भाषणे झाली.***

टिप्पण्या