मुंबई दि.१०
: सोडत लागलेल्या गिरणी कामगारांना घरांच्या चाव्या देण्याचा कर्यक्रम पूढील आठवड्यात होईल,असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांना दिले आहे.त्यामुळे पैसे भरून घराचा ताबा न मिळालेल्या कामगारांनी नव्या घरात घुसखोरी करण्या चा आपला कार्यक्रम आज रद्द केला आहे.
शासकीय चावी वाटपाचा कार्यक्रम लांबत चालल्याने घरांच्या चाव्या मिळण्यास विलंब होत आहे,हे लक्षात येताच आमदार सचिनभाऊ अहिर यांनी उपमुख्यमंत्र्यांना दूरध्वनीद्वारें विनंती करताच, त्यांनी वरील प्रमाणे आश्वासन दिले आहे.
सन २०२० मध्ये स्प्रिंग, बॉम्बे डाइंग प्रभादेवी व श्रीनिवास मिलच्या ३९८० कामगारांची सोडत लागूनही त्यांना अद्याप घराचा ताबा मिळा लेला नाही.काही कामगारांनी तर पैसे भरूनही त्यांना घराचा ताबा मिळालेला नाही.त्या मुळे कामगारां मध्ये कमालीची अस्वस्थता पसरली होती.त्या कामगारांच्या समस्या जाणून त्यांचे निरसन करण्यासाठी आज सचिनभाऊ अहिर यांनी भोईवाडा येथील स्प्रिंग मिलच्या व लोअर परेल येथील श्रीनिवास मिलच्या घरकुल संकुलाला भेटी दिल्या.त्यावेळी खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष बजरंग चव्हाण, सेक्रेटरी शिवाजी काळे तसेच म्हाडाचे अधिकारीही त्या वेळी उपस्थित होते.
कामगारांची आमदार सचिन अहिर यांनी भेट घेतली असता अनेक कामगारांनी सांगितले, पात्रतेच्या प्रश्नावर अकारण रखडपट्टी करण्यात येत आहे.स्प्रिंग मिलच्या जवळपास २०० कामगारांनी बॅंकेचे कर्ज घेऊन पैसे भरले. पण त्यांना अद्याप घराचा ताबा मिळालेला नाही,असेही सांगितले.
ज्या कामगारांनी पैसे भरले आहेत,त्यांनी येत्या आठ दिवसात प्रश्न सुटला नाही तर सोडत लागलेल्या घरात घुसून ताबा घेण्याचा निर्धार केला आहे.
****"
addComments
टिप्पणी पोस्ट करा