डॉ.सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर यांच्या जन्मदिन विविध उपक्रमाने साजरा


पाचशे हुन अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी तर ६८ रक्तदात्यांनी केले रक्तदान

मुखेड प्रतिनिधी / मुस्तफा पिंजारी

तालुक्यातील बेटमोगरा येथे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतिक असलेले शिवलिंग बादशहा मठ संस्थानचे मठाधिपती सदगुरू डॉ सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर यांच्या ४४ वा जन्मोत्सव दि.५ जून रोजी शिवलिंग बादशहा मठ संस्थानात विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला. 

              सद्गुरू डॉ. सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर यांचे अनेक उपक्रम समाज व राष्ट्रउपयोगी असतात. त्यात कपिलधार पदयात्रा, अनेक अखंड शिवनाम सप्ताह, रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी, वृक्षारोपण, गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार, शेतकरी मेळावा, महिला बचत गटांना मार्गदर्शन, पालक मेळावा, नदी वाचवा यासोबत प्रेम, सौहार्द,विश्वास व भाईचारा टिकवून ठेवण्यासाठी हिंदू-मुस्लिम एकतेचे अनेक उपक्रम महाराजांच्या हस्ते पार पाडले जातात. त्याच्याच एक भाग म्हणून बेटमोगरा येथील सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित येऊन सद्गुरू डॉ. सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर यांच्या ४४ वा जन्मोत्सव रक्तदान शिबीर,आरोग्य तपासणी व वृक्षारोपण अशा अनेक सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचा पहिल्या सत्रात युवा नेते बालाजी पाटील बेटमोगरेकर यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे व आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले असून या शिबिरात पाचशे हुन अधिक लोकांची आरोग्य तपासणी व तब्बल ६८ युवकांनी रक्तदान केले आहे. तसेच दुसऱ्या सत्रात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांच्या हस्ते शिवलिंग बादशहा मठ संस्थान परिसरात वृक्षारोपण करण्यात आले तर या सोबत अन्नछत्र उद्घाटन धनराज पाटील बेटमोगरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. 

       या कार्यक्रमात डॉ सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य बळवंतराव पाटील बेटमोगरेकर, नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे संचालक मोहनराव पाटील टाकळीकर,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दत्तात्रय पाटील बेटमोगरेकर,सरपंच नय्युम दफेदार आदींसह पंचक्रोशीतील हजारो नागरिकांची उपस्थिती होती. 

    या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी आयोजक मेनकुदळे परिवार व आरोग्य शिबिर व्यवस्थापक भास्कर डोईबळेडोईबळे तसेच तज्ञ डॉक्टर्स, नर्स व ग्रामस्थांनी प्रयत्न केले.या कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने करण्यात आली.

टिप्पण्या