जागतिक वर्धापन दिनानिमित्त मुंबई पोर्ट प्राधिकरणाने ५ जून २०२३ रोजी रे रोड येथे वृक्षारोपण प्रकल्पाचे उद्घाटन केले. याप्रसंगी मुंबई पोर्टचे चेअरमन श्री. राजीव जलोटा यांनी उपस्थित सर्वांना पर्यावरणाची शपथ देऊन, मार्गदर्शन करताना सांगितले की, मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केल्यास प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. आम्ही मुंबई पोर्टच्या मोकळ्या जागेवर वृक्षारोपण करीत आहोत. या कार्याला एचडीएफसी व महिंद्रा पाठिंबा देत आहे.
पथनाट्यद्वारे वृक्षारोपण कार्यक्रमाचे महत्त्व सांगण्यात आले. हरित दूरदृष्टीवर आधारित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी एचडीएफसीच्या प्रमुख अशीमा भट्ट व नसरत पठाण उपस्थित होते. महिंद्राच्या जनरल मॅनेजर स्वाती श्रीवास्तव म्हणाल्या की, वृक्षारोपणाची संधी दिल्याबद्दल आम्ही मुंबई पोर्टला धन्यवाद देतो. मुंबई पोर्टने ११ हजार झाडे लावण्यासाठी १० जागा निश्चित केल्या आहेत. अशिमा भट्ट यांनी वृक्षारोपण, पर्यावरण व एचडीएफसीच्या कार्याचे महत्त्व समजून सांगितले. मुंबई पोर्ट कार्पोरेट स्तरावर वृक्षारोपण करणार असून, मेंटेनन्सबाबत वाय फोर डी यांचे सहकार्य घेतले जाईल. याप्रसंगी वाय फोर डी (Y4D ) चे संस्थापक प्रफुल्ल निकम यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास हरित मुंबईवर प्रेम करणारे खाते प्रमुख व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी एम. आर. एस. कुरेशी यांनी आभार मानले. येणाऱ्या काही दिवसात मुंबईतील नागरिकाना मुंबई पोर्टच्या पूर्व किनाऱ्यावर हरित भाग पाहण्यास मिळेल. मुंबई पोर्ट शहराच्या पूर्व किनाऱ्यावर ऑक्सिजन निर्माण करण्यास मदत करणार आहे.
आपला
मारुती विश्वासराव
addComments
टिप्पणी पोस्ट करा