नूतन विद्यालयाची धनश्री आकात सेलू तालुक्यातून सर्वप्रथम नूतन कन्या शाळेचा निकाल ९०.९६ टक्के


सेलू : येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचालित नूतन विद्यालयाची विद्यार्थिनी धनश्री अशोक आकात हीने दहावीच्या परीक्षेत ९८.८० टक्के गुण मिळवून सेलू तालुक्यातून सर्वप्रथम क्रमांक पटकावला आहे. शाळेतून यश मुकुंदराव देवढे (९७.००) याने द्वितीय, तृतीय संकल्प रामवल्लभ राठी ( ९६.२०), तर गौरी गोपाल सोनी (९५.८०) चौथ्या व साक्षी रमेश मैड ९५.६० टक्के गुण मिळवून शाळेतून गुणानुक्रमे पाचवी आहे. मार्च २०२३ च्या शालांत परीक्षेत एकूण ४५५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ३८३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शाळेचा निकाल ८४.१७ टक्के आहे. प्रावीण्य श्रेणीत १०६, प्रथम श्रेणी ११५, द्वितीय श्रेणीत ११०, तर पास श्रेणीत ५२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. २२ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांवर गुण आहेत. नूतन कन्या प्रशालेच्या ३४३ पैकी ३१२ (९०.९६) विद्यार्थ्यिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. इरा मोहन खापरखुंटीकर (९६.६०) प्रतीक्षा प्रदीप फंड (९६.२०), श्रावणी दत्तात्रय हेलसकर (९५.८०) संचिता रामप्रसाद वाघ (९५.६०) यांनी अव्वल स्थान पटकावले आहे. 

यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया, उपाध्यक्ष डी.के.देशपांडे, सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, सीताराम मंत्री, नंदकिशोर बाहेती, दत्तराव पावडे, प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, मकरंद दिग्रसकर आदींसह संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक नारायण सोळंके, मुख्याध्यापिका संगीता खराबे, उपमुख्याध्यापक संतोष पाटील, डी.बी.घोगरे, किरण देशपांडे, देविदास सोन्नेकर, रोहिदास मोगल, गणेश माळवे, बाबासाहेब हेलसकर, सुधीर जोशी, सतीश नावाडे, उज्ज्वला लड्डा आदींसह पालक शिक्षक संघाचे पदाधिकारी, सदस्य, शिक्षक, कर्मचारी आदींनी कौतुक केले आहे.


फोटो ओळी : 

धनश्री आकात (९८.८०)

यश देवढे (९७.००)

संकल्प राठी ( ९६.२०)

श्रावणी हेलसकर (९५.८०)

इरा खापरखुंटीकर (९६.६०)

प्रतीक्षा फंड (९६.२०),

गौरी सोनी (९५.८०)

साक्षी मैड (९५.६०)


पूर्ण...

टिप्पण्या
Popular posts
पोदार इंटरनॅशनल स्कूल नांदेडचे दहावीच्या निकालात घवघवीत यश
इमेज
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या विविध उपसमित्या जाहिर अभिमन्यू पवार, लातूर – उपाध्यक्ष, सौ. अश्विनी पाटील, पुणे, व सौ ग्रीष्मा पाटील, पालघर – उपाध्यक्ष पदी
इमेज
मिल्लत नगरच्या नागरी सुविधासाठी लोकविकासचे शिष्टमंडळ मनपा आयुक्तांना भेटणार (तातडीने कारवाई केली नाहीतर माकप आंदोलनाच्या पवित्र्यात)
इमेज
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची आजच्या समाजाला गरज
मराठा आरक्षण मुद्द्यावरून तरुणाने गळफास घेऊन केली आत्महत्या.
इमेज