*टेबल टेनिस खेळाडूंना प्राथमिक स्तर ते राष्ट्रीय स्तरावर प्रशिक्षण मिळावे: राज्य सचिव यतिन टिपणीस*



परभणी (. ) महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशन वतीने महाराष्ट्र राज्य भर दौऱ्यावर करत मराठवाडा दौऱ्यावर करताना छञपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड लातूर, उस्मानाबाद, बीड जिल्ह्यातील टेबल टेनिस असोसिएशन ला भेट देऊन, जिल्हा असोसिएशन च्या वतीने टेबल टेनिस चा विकासाची व खेळांचा प्रसार प्रचार करण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. 

    परभणी जिल्हा हौशी टेबल टेनिस असोसिएशन व सेलू , परभणी तालुका असोसिएशन ची भेट घेऊन पदाधिकारी व खेळाडू सोबत चर्चा केली. 

   परभणी येथील खेलो इंडिया टेबल टेनिस प्रशिक्षण केंद्रावर सत्कार सोहळा कार्यक्रम राज्य सचिव यतिन टिपणीस म्हणाले की टेबल टेनिस खेळाडूंना प्राथमिक स्तर ते राष्ट्रीय स्तरावर प्रशिक्षण मिळावे यांतून राष्ट्रीय स्तरावर खेळाडू निर्माण होतील, परभणी जिल्ह्यात सेलू, व परभणी तालुका असोसिएशन व विविध क्लबच्या माध्यमातून खेळाडू निर्माण होतात. आज हे खेळाडू राष्ट्रीय स्तरावर खेळत आहेत. याप्रसंगी परभणी सिटी क्लब सचिव डॉ. विवेक नावंदर,खो-खो राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे, जिल्हा सचिव गणेश माळवे, परभणी तालुका सचिव अजिंक्य घन, सेलू तालुका निखिल झुटे, उपस्थित होते.

    याप्रसंगी परभणी जिल्हा सचिव गणेश माळवे यांनी परभणी शहरातील विविध क्लबच्या व तालुका असोसिएशन माध्यमातून टेबल टेनिस खेळांचा प्रसार प्रचार केला बदल अभिनंदन केले. व टेबल टेनिस मुख्य प्रशिक्षक चेतन मुक्तावार यांनी आद्या बाहेती, ओंवी बाहेती राष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू निर्माण केल्या बदल अभिनंदन करून पुढील स्पर्धेस शुभेच्छा दिल्या. 

    सेलू तालुक्यात फ्रेंड्स क्लब सेलू, तालुका क्रीडा संकुल, सेलू नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सेलू, प्रसिद्ध उद्योजक जयप्रकाशजी बिहाणी, विनोद मिञ मंडळ ,तसेच परभणी जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय,खेलो इंडिया टेबल टेनिस प्रशिक्षण केंद्र ला भेट देऊन त्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. 

   कार्यक्रम यशस्वीतेसाठी साईराज बोराडे, डी.डी. सोन्नेकर, सर्जेराव लहाने, सचिन विखे, रवींद्र कुलकर्णी, जुगलकिशोर बाहेती,विजय अवचार

तुषार जाधव, सूरज भुजबळ, धीरज नाईकवाडे, आदींनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या