उपनिरीक्षक तावडे यांच्या पुढाकाराने दलीत वस्ती रस्त्याचा वाद सामंजस्याने मिटला

 


प्रतिनिधी - महेंद्र पुरी हिंगोली

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील कोंडशी येथे दलीत वस्तीमध्ये रस्त्याचे काम सुरू होते. जे काम काही नागरीकांनी अडवले होते. मागील तिन दिवसांपासून सुरू असलेला रस्त्याचा वाद जवळा बाजार चौकिचे पोलिस उपनिरीक्षक सतीश तावडे यांनी पुढाकार घेऊन सदरील नागरिकांना समजावून सांगत सामंजस्याने रस्त्याचा वाद मिटवला. कोंडशी या गावातील दलीत वस्तीमध्ये रस्त्यासाठी खासदार फंडातुन रस्त्यावर पेवरब्लाक टाकण्यासाठी शासनाकडुन निधी मंजूर झाला होता. मात्र गावातील बाजीराव श्रिरामे व अन्य काही नागरीकांनी सदर रस्त्यावर मालकी हक्क सांगत रस्त्याचे काम आडवले होते. या बाबत ग्रामसेवक संरपंच यांनी जवळा बाजार येथील चौकीत तक्रार अर्ज सादर केला होता. सदर रस्त्याचा वाद मागील सहा दिवसांपासून सुरू होता. हट्याचे सहायक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सतीश तावडे यांनी पुढाकार घेऊन संबंधीत बाजीराव श्रिरामे यांना कागद पत्रे सादर करण्यासाठी मुदत दिली होती मात्र श्रिरामे यांनी मालकी हक्काचे पुरावे सादर केले नाही त्यानंतर तावडे यांनी समजावून सांगत सामंजस्याने व सलोख्याने सदर वाद मिटवला. मराठवाड्यात दलीत सवर्ण वादाच्या घटना घडत असुन कोंडशी येथे कुठलाही वाद निर्माण होऊ नये याची दक्षता घेऊन जवळा बाजार पोलिस चौकीचे कर्तव्यदक्ष उपनिरीक्षक सतीश तावडे यांनी गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या समोर रस्ता आडवणा रे श्रिरामे यांना समजावून सांगत सामंजस्याने हा वाद मिटवला. आज दलीत वस्तीतील रस्त्याचे काम पुर्ववत सुरू झाले आहे. उपनिरीक्षक सतीश तावडे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधिकारी म्हणुन जी महत्वाची भुमीका निभावली त्या बद्दल त्यांचे गावकऱ्यांनी कौतुक केले.

टिप्पण्या