सीईटी परीक्षेत शैवी बलवतकर प्रथम*

 

मुंबई - राज्य सामायिक परीक्षा कक्षाकडून ( सीईटी सेल) घेण्यात आलेल्या इंजिनीअरिंग, कृषी, फार्मसी अभ्यासक्रमाच्या एमएचटी सीईटी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर केला आहे. राज्यातील २८ विद्यार्थ्यांनी एमएचटी सीईटी परीक्षेत १०० पर्सेटाइल गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यामध्ये शैवी बलवतकरने PCB मध्ये 100 टक्के आणि PCM मध्ये 99.08 टक्के मिळवून MAH-CET मध्ये अव्वल स्थान पटकावले. यात मुंबईतील सात जणांचा समावेश आहे.

सीईटी सेलने ९ मे ते २० मे दरम्यान राज्यातील १९७ केंद्रांवर पीसीएम आणि पीसीबी ग्रुपची सीईटी परीक्षा घेतली. राज्यभरातून ५ लाख ९१ हजार विद्यार्थी या परीक्षेस बसले होते. यातील ३ लाख १३ हजार विद्यार्थ्यांनी पीसीएम ग्रूपची परीक्षा दिली. तर २ लाख ७७ हजार विद्यार्थ्यांनी पीसीबी ग्रूपची परीक्षा दिली.

दररोज ८ ते १० तास अभ्यास गुण करून हे यश तिने मिळविले आहे. आता पुढे कम्प्युटर इंजिनीअरिंगला अथवा मेडिकलला प्रवेश घेणार आहे. 'नीट'चा निकाल जाहीर झाल्यावर त्याबाबत निर्णय घेईन. आई-वडील आणि तज्ज्ञांशी चर्चा करून पुढील प्रवेशाचा निर्णय घेईन', असे शैवी हिने नमूद केले.

टिप्पण्या