गोदी कामगारांच्या वतीने डॉ. शांती पटेल यांचा स्मृतिदिन साजरा*


स्वातंत्र्य सैनिक, मुंबईचे माजी महापौर, माजी खासदार, ज्येष्ठ कामगार नेते डॉ. शांती पटेल यांचा गोदी कामगारांच्या वतीने १३ जून २०२३ रोजी ९ वा स्मृतिदिन ऑरेंज गेट जवळ डॉ. शांती पटेल चौकात डॉ. शांती पटेल यांच्या प्रतिमेला ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये, डॉ. यतीन पटेल, बोर्ड मेंबर दत्ता खेसे, उपाध्यक्ष निसार युनूस यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला.

 स्मृतिदिनानिमित्त कामगार सदन येथे युनियनच्या कार्यालयात डॉ. शांती पटेल यांच्या प्रतिमेला युनियनचे अध्यक्ष ॲड. एस. के. शेट्ये, कार्याध्यक्ष डॉ. यतीन पटेल व बोर्ड मेंबर दत्ता खेसे यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला. याप्रसंगी कामगार सदन सभागृहात आय. एल. वो. व अलंग शिप ब्रेकींग वर्कर्स असोसिएशनच्या वतीने तयार करण्यात आलेल्या सुरक्षा डायरीचे प्रकाशन ॲड. एस. के. शेट्ये यांच्या हस्ते करण्यात आले. युनियनचे पदाधिकारी डॉ. यतीन पटेल, विद्याधर राणे, दत्ता खेसे, विजय रणदिवे, विकास नलावडे, शीला भगत, निसार युनूस इत्यादी मान्यवरांची डॉ. शांती पटेल यांच्या आठवणींवर आधारित भाषणे झाली. याप्रसंगी युनियनचे पदाधिकारी संदीप कदम, मनीष पाटील, संदीप चेरफळे, मारुती विश्वासराव, संदीप कदम, आदी कामगार कार्यकर्ते उपस्थित होते.

  स्मृतिदिनानिमित्त कॉटन ग्रीन येथे चालक मालक आणि तंत्रज्ञ या युनियनच्या विश्रांती ग्रहात डॉ. शांती पटेल यांच्या प्रतिमेला बोर्ड मेंबर दत्ता खेसे यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला. 

आपला

मारुती विश्वासराव

प्रसिध्दीप्रमुख

मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन

टिप्पण्या