*वडाळा येथील मुंबई पोर्ट रुग्णालयामध्ये कॅन्टीनची सुविधा उपलब्ध*


वडाळा येथील मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या हॉस्पिटल परिसरात खूप वर्षांपासून कॅन्टीनची सोय नसल्यामुळे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या आजी माजी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्यामुळे सर्व संबंधितांमध्ये कमालीचा असंतोष पसरला होता. अनेक तक्रारी युनियनकडे आल्या होत्या. याबाबत मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन व इतर संघटनानी पाठपुरावा केल्यामुळे, या ज्वलंत विषयाची दखल वरिष्ठ सबंधित अधिकाऱ्यांनी घेऊन, युनियन्सच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेवून हमालेज को.ऑप. कॅन्टीनच्या सहयोगाने हॉस्पिटल परिसरात पुन्हा कॅन्टीनची सोय करण्याचे ठरले. त्यानुसार ३ मे, २०२३ रोजी कॅन्टीन सुविधा सुरू करण्याचे उद्घाटन झाले. उद्घाटनप्रसंगी ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये, मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्पलॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज, मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर दत्ता खेसे, कल्पना देसाई, युनियनच्या उपाध्यक्ष शीला भगत, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे सेक्रेटरी बबन मेटे, मुंबई पोर्ट प्राधिकरण स्थानिय लोकधिकार समितीचे अध्यक्ष मिलिंद घनकुटकर, मुख्य चिकित्सा अधिकारी डॉ. सुजाता मोकल, आणि मुख्य श्रम अधिकारी रफी कुरेशी यांनी मार्गदर्शनपर भाषणे केली. हमालेज को.ऑप. कॅन्टीनचे अध्यक्ष निसार युनूस यांनी सभेचे सूत्रसंचालन केले तर जनरल सेक्रेटरी बापू घाडीगावकर यांनी आभार मानले. यावेळी मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे अध्यक्ष राजीव जलोटा, उपाध्यक्ष आदेश तितरमारे यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. या उपक्रमासाठी ज्या ज्या व्यक्तींनी आपलं योगदान दिलं त्यांनाही मनापासून धन्यवाद दिले. या कॅन्टीनच्या उद्घाटनप्रसंगी पोर्ट ट्रस्ट हॉस्पिटलमधून कर्मचारी आणि त्यांच्या नातेवाईकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.

आपला 

मारुती विश्वासराव

 प्रसिद्धीप्रमुख 

मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन

टिप्पण्या
Popular posts
23 उमेदवारांचे भवितव्य 4 जून पर्यंत मतयंत्रात बंद निरीक्षकांच्या उपस्थितीत सर्व पेटया स्ट्राँग रूममध्ये*
इमेज
थोरांदळे गावात हनुमान जयंती उत्सवानिमित्त पुरी, गुळवणी व चटणीचा महाप्रसाद*
इमेज
मुंबई पोर्ट ट्रस्टमधील सामाजिक कार्यकर्ते सतीश तुपे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार*
इमेज
तब्बल ३८ दिवस चोवीस तास कार्यालयात मुक्काम ठोकणाऱ्या धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांचा भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार
इमेज
नांदेड जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना (जुक्टा) कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा जाहीर सत्कार
इमेज