*मैदानी खेळामुळे सर्वांगीण प्रगती मा. आ. विजयराव भांबळे* *सेलूत राज्य शालेय फ्लोअर बॉल स्पर्धेला प्रारंभ*


सेलू (. ) 

                   सध्याच्या मोबाईल च्या काळात युवकांनी स्वतः च्या सर्वांगीण विकासासाठी मैदानी खेळ खेळावेत असे आवाहन माजी आमदार विजयराव भांबळे यांनी केले. 

           क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय व परभणी जिल्हा फ्लोअर बॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने येथील महेश ॲग्रो इंडस्ट्री सेलू च्या मैदानावर दि. ६ मे रोजी पहिल्या राज्य शालेय फ्लोअर बॉल स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. 

       कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन चे संस्थाध्यक्ष डॉ सत्यनारायण लोया, प्रमुख पाहुणे म्हणून राज्य सचिव रमेश चोथवे, जिल्हाध्यक्ष अशोक काकडे, जिल्हा परिषद चे माजी उपाध्यक्ष राजेंद्र लहाने, नूतन वि. शालेय समिती अध्यक्ष सितारामजी मंत्री, तालुका क्रीडाधिकारी शैलेंद्र गौतम, राज्य खो-खो मार्गदर्शक संजय मुंडे, तांत्रिक समिती प्रमुख प्रा. दीपक वाडे,रघुनाथ बागल, सुधाकर रोकडे, विशाल देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. 

       दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत राज्य भरातून आठ विभागाचे १७ व १९ वयोगटातील मुले व मुलींचे १६ संघ असे एकुण ४८० खेळाडू सहभागी झाले आहेत. या सर्वांची निवास व भोजन व्यवस्था संयोजन समितीच्या वतीने करण्यात आली आहे. 

या प्रसंगी राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त प्रा.नागेश कान्हेकर यांचा सत्कार करण्यात आला. 

  कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यसचिव रमेश चोथवे यांनी केले, सुत्रसंचालन सुभाष मोहकरे तर प्रा नागेश कान्हेकर यांनी आभार मानले. स्पर्धा यशस्वी ते सांठी संयोजक जिल्हा सचिव प्रशांत नाईक, डी. डी. सोन्नेकर, सतीश नावाडे, कैलास टेहरे अनुराग आमटी, सोनू नाईक, बालाप्रसाद राठोड, कुणाला चव्हाण, स्वप्निल चव्हाण आदी परिश्रम घेत आहेत.

टिप्पण्या