आज हदगांव शहरातील बिरदाळे व तांलग येथील मिराशे कुटुंबातील विवाहासाठी


 हदगाव प्रतिनिधी 

 हदगांव शहरातील बिरदाळे व तांलग येथील मिराशे कुटुंबातील विवाहासाठी सामाजिक कार्यकर्ते राजु पांडे साहेब यांच्या मातोश्रीच्या स्मरणार्थ दहा हजार रुपये, सामाजिक कार्यकर्ते अमोल जाधव पारवेकर यांच्या विवाह वाढदिवसाच्या निमित्ताने पाच हजार रुपये, गजानन अंनतवार कवानकर पाचशे रुपये,व रयत प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने पंधरा हजार रुपये या सर्व मदतीतून हदगांव येथे संसार उपयोगी साहित्य व तांलग येथे अन्नदान साहित्य घरपोच देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली.


यावेळी रयत प्रतिष्ठानचे अध्यक्ष सहशिक्षक सटवाजी पवार जवळगावकर आशादिप फाउंडेशनचे सचीव हरीश्चद्र चिल्लोरे सामाजिक कार्यकर्ते राजु पांडे, सामाजिक कार्यकर्ते अमोल जाधव पारवेकर पत्रकार बंडु माटाळकर गजानन अंनतवार कवानकर,सवीताताई विनोद निमडगे पळसेकर, पत्रकार प्रभाकर दहिभाते बरडशेवाळा, संदिप मिराशे तांलगकर, भागवत मिराशे, रुस्तुम गाडे, धनंजय मिराशे, रमेश निर्मल यांच्या सह गावातील प्रतिष्ठित नागरिक कार्यकर्ते उपस्थित होते.टिप्पण्या