बेरळी खु.येथील चार महिन्यांपासून निकामी झालेल्या विद्युत रोहित्राची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी


मुखेड प्रतिनिधी / मुस्तफा पिंजारी

तालुक्यातील मौजे बेरळी खु.येथील बेसके डि.पी वरील दोन विद्युत रोहित्र गेल्या चार महिन्यांपासून निकामी झाले आहे.तसेच तात्पुरता एकाच विद्युत रोहित्रावर अख्या गावाला विद्युत पुरवठा करण्यात येत होता मात्र तोही विद्युत रोहित्र गेल्या एक महिन्यापासून बंद झाला असून असे एक- एक करून तब्बल चार विद्युत रोहित्र निकामी झाल्याने याच्या नाहक त्रास गावकऱ्यांना सहन करावा लागत आहे. तसेच बंद असलेल्या विद्युत रोहित्रामुळे गावात पाणी पुरवठा सुद्धा पुर्णपणे बंद असून ऐन रखरखत्या उन्हात गावकऱ्यांसह गुऱ्हे ढोरांना सुद्धा पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तसेच वारंवार खंडित अलेल्या विद्युत पुरवठ्यामुळे गावात चोरीचेही प्रमाण वाढले आहे.बेरळी खु.येथील अशा प्रमुख समस्येवर महावितरण कंपनीने त्वरित लक्ष केंद्रित करून बंद असलेल्या विद्युत रोहित्राची तात्काळ दुरुस्ती करुन विद्युत पुरवठा सुरळीत करावा अन्यथा येत्या २३ में रोजी मुखेड येथील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयात गावकऱ्यांसह आंदोलन करण्यात येईल असा इशारा एका निवेदनाद्वारे कार्यकारी अभियंता देगलूर व उपकार्यकारी अभियंता उपविभागीय मुखेड येथील कार्यालयात देण्यात आले.

    यावेळी या निवेदनावर सरपंच प्र.भगवान तोटेवाड, उपसरपंच प्र.सिद्धार्थ कांबळे बेळीकर,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्ता बद्देवाड, ज्ञानेश्वर कांबळे सह आदींची स्वाक्षऱ्या आहेत.

टिप्पण्या