रायपाटण गावच्या वाडी रस्त्याच्या कामाचा खेळखोळंबा* *ग्रामस्थांमध्ये कमालीची अस्वस्थता आणि असंतोष*


    मुंबई दि‌.२४: जिल्हा रत्नागिरी, तालूका राजापूरातील कदमवाडी रस्त्याच्या कामासाठी बीजेपी आमदार प्रसाद लाड यांनी मंजूर केलेला निधी आणि ग्रामस्थांच्या पाठपुराव्यामुळे ५० वर्षाचे काम आता मार्गी लागत असतांना स्थानिक प्रशासनाने कंत्राट बांधणीचे काम कुणाला द्यायचे?या वरुन वाद निर्माण केल्याने होणा-या कामाचा खेळ खोळंबा झाला आहे.त्यामुळे ग्रामस्थांमध्ये कमालीची अस्वस्थता आणि असंतोष पसरला आहे.

    रायपाटणगावच्या या वाडीरस्त्याचे कच्चे काम वाडीतील महिला, पुरुष आणि युवा ग्रामस्थांनी श्रमदानातून केले होते.शाळा,हॉस्पिटल, बाजारहाटासाठी हाच महत्त्वाचा रस्ता ठरल्याने भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी या रस्त्याच्या डांबरीकरणाला प्रथम प्राधान्य दिले होते. त्यासाठी मुंबईतील प्रमुख ग्रामस्थांनी गेले वर्षभर सातत्याने कामाचा पाठपुरावा केला होता.त्या प्रमाणे आमदार प्रसाद लाड यांच्या विकास निधीतून १५ लाख रूपयांचा निधी संमत केला गेला आणि तो निधी ग्रामपंचायत निधीमध्ये गोळाही झाला‌.त्या साठी कंत्राटदारांनी विहीत नमुन्यात भरलेल्या कोटेशन मधून कंत्राट दाराला काम मुक्रर करण्यात आले.परंतु आता वर्क ऑर्डर काढतांना स्थानिक कंत्राटदाराला प्राधान्य देण्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आल्याने कामाचा खेळखोळंबा झाला आहे.पाऊस आधीच तोंडावर आला अस ल्याने ग्रामस्थ चिंतेत पडले आहेत.येत्या दोन दिवसात हा वाद मिटला नाही तर आमदार प्रसाद लाड यांच्या मार्फत राज्य प्रशासनापर्यंत हा प्रश्न नेण्याचा ग्रामस्थांनी विचार केला आहे.*****

टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
वंशावळीच्या प्राचीन सरीतून' : अपरिहार्यपणे अवतरलेली भेदक कविता डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज
माहूर शहरात क्रांतिसूर्य बिरसामुंडा यांची जयंती विवीध ठिकाणी साजरी.
इमेज