चाकुर येथे राज्य शालेय टेनिसव्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा* *राज्यभरातील ३५० खेळाडू चा सहभाग*


लातूर (. . ) क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पूणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय लातूर व लातूर जिल्हा टेनिसव्हॉलीबॉल असोसिएशन वतीने राज्य शालेय टेनिसव्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा दि. २६ ते २७ मे रोजी किशनराव देशमुख महाविद्यालय चाकुर येथे आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी दिली. 

       राज्यतील अमरावती, औरंगाबाद, लातूर, कोल्हापूर, नाशिक, नागपूर, पुणे, मुंबई, आठ विभागतील स्पर्धेत १४/१७/१९/वर्षे आतील मुले व मुली गटातील ४८ संघातील खेळाडू ,व्यवस्थापक पंच एकुण ३५० सहभागी होणार आहेत. 

     क्रीडा उपसंचालक सुधीर मोरे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, क्रीडाधिकारी चंद्रकांत लोदगेकर, यांच्या टेनिस व्हॉलीबॉल खेळांचे जनक डॉ.व्यंकटेश वांगवाड, राज्य अध्यक्ष सुरेशरेड्डी क्यातमवार, राज्य सचिव गणेश माळवे, लातूर जिल्हा अध्यक्ष सचिन शिंदे, प्राचार्य डॉ. धोंडगे , राहुल पेटकर, संतोष शिंदे आदी उपस्थित राहणार आहेत.

टिप्पण्या