सेलूत विभागीय शालेय टेनिसव्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन भारतीय नाविन्यपूर्ण खेळ टेनिस व्हॉलीबॉल: अजय गव्हाणे


  


सेलू दि. 19 (. ) क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय व परभणी जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १९ मे रोजी येथील नूतन विद्यालयात विभागीय शालेय टेनिसव्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन करताना अजय गव्हाणे म्हणाले भारतीय नाविन्यपूर्ण टेनिस व्हॉलीबॉल खेळ शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी उपयुक्त खेळ आहे, भारतीय खेळास प्रोत्साहन देऊन हा खेळ आपण सर्वांनी एकत्र येऊन जागतिक पातळीवर नेऊन बोलत होते. 

       कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन चे मुख्याध्यापक नारायण सोळंके, प्रमुख पाहुणे म्हणून अजय गव्हाणे (सचिव महात्मा फुले शिक्षण संस्था परभणी) राज्य सचिव गणेश माळवे, मीनाजभॉई (उद्योजक परभणी) सुधीर चौधरी (अध्यक्ष जनसेवा ना.स.पतसंस्था) रामेश्वर कोरडे (विभागीय सचिव टेनिस व्हॉलीबॉल), राज्य खो-खो मार्गदर्शक संजय मुंडे, क्रीडाधिकारी शैलेंद्र गौतम, संतोष पाटील, डी.डी.सोन्नेकर, यांची प्रमुख उपस्थिती होती. 

       या स्पर्धेत विभाग तून परभणी ग्रामीण, बीड, हिंगोली, परभणी मनपा १४,१७ व १९ वयोगटातील मुले व मुलींचे एकुण १८० खेळाडू सहभागी झाले आहेत. 

या प्रसंगी राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त प्रा.नागेश कान्हेकर यांचा सत्कार करण्यात आला. 

  कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यसचिव गणेश माळवे यांनी केले, सुत्रसंचालन प्रा नागेश कान्हेकर यांनी तर आभार सतिश नावाडे मानले स्पर्धा यशस्वी ते सांठी संयोजक जिल्हा सचिव सतिश नावाडे, प्रशांत नाईक, सतीश नावाडे, संतोष शिंदे, सिध्दांत लिपने, चंद्रशेखर ताठे, सोमनाथ पोपळे, आदी परिश्रम घेत आहेत.

टिप्पण्या