राम दातीर
माहूर (प्रतिनिधी) माहूर तालुक्यातील गोकुळ गोंडेगाव येथे दि . ११ एप्रिल २३ रोजी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक पार पडली . हेमंत गावंडे पाटील यांची चेअरमन पदी बिनविरोध निवड करण्यात आली व व्हाईसचेअरमन पदी ज्योती सुभाषराव डाखोरे यांची निवड करण्यात आली आणि एकूण १३ सदस्यांची निवड करण्यात आली . निवड प्रक्रियेपूर्वी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पुष्पहाराने पूजन करून ग्रा.पं. गोकुळ गोंडेगाव येथे म.फुले यांची जयंती साजरी करण्यात आली . त्यानंतर चेअरमन , व्हाईसचेअरमन व सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले व सरपंच राम सिडाम यांनी सर्वांचे अभिनंदन केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय मानकर यांनी केले तर आभार संदीप राकेश यांनी मानले यावेळी कार्यक्रमात उपस्थित नवनिर्वाचित चेअरमन हेमंत गावंडे पाटील , व्हाईसचेअरमन ज्योती डाखोरे , सरपंच राम सिडाम , अनमाळ येथील पो . पाटील नरवाडे पाटील , दिनेश गावंडे , प्रवीण गावंडे पाटील , देवराव गावंडे , दिगंबर कुटे , नारायण कुटे , गणपत गावंडे , माणिक गावंडे , संदीप राकेश , उत्तम राठोड , गुलाब भगत , अंबादास ताटेवार , पंचफुल हातमोडे , गोकुक येथील पो.पाटील अमोल सोळंके , पत्रकार रुपेश मोरे . अभिषेक कणेर्वार आदींची उपस्थिती होती .

COMMENTS