राम दातीर
माहूर (प्रतिनिधी )माहूर तालुक्यात निसर्गनिर्मित हजारो हेक्टर जंगल असून त्या जंगलामध्ये वन विभागाकडून या वर्षी झालेली विकास कामे निकृष्ट दजार्ची होत असताना अनेक वेळा निवेदन देऊनही साधी चौकशी न झाल्याने मनसेचे माहूर तालुका अध्यक्ष राजू पवार यांनी मुंबई येथे जाऊन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन झालेल्या कामांची चौकशी करून कारवाई करण्यासाठी निवेदन देऊन मागणी केली आहे.
माहूर तालुक्यातील जंगलात यावर्षी वझरा शेख फरीद येथे वनतळे बांधण्याचा कामांमध्ये सपाट जमिनीवर माती टाकण्यात आली आणि बांध उंच दिसावा यासाठी त्यामध्ये सागवानी लाकडे झाडे दाबण्यात आली सागवानी आहेत तसेच आठ हजार वृक्ष लागवडी पैकी एकही वृक्ष लावण्यात न आल्याने जंगल दिवसेंदिवस टकले होत असून असून याआधी झालेल्या माती नाला बांधालाच जेसीबी द्वारे उकरून त्यालाच वनतळे दाखवण्यात आले असून कामे नियमानुसार झाली नसल्याने जंगलाला लागून असलेल्या गावकऱ्यांना मजुरांना रोजगार न देता बाहेरील नागरिकांच्या नावावर मजुरी दाखविण्यात आली येत आहे.तसेच मांडवा येथील तार कंपाउंड चे काम जाळी न लावल्याने जाळी लावण्याचे नावावर केले आहे. उभारण्यात आली आलेली शासनाकडून सागवानी लाकडे सुद्धा चोरांनी उखाडून नेले असून कसारपेठ येथील वन तळे व्यवस्थित न केल्याच्या येथील नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत.
जंगलातील मौल्यवान सागवानी लाकडांची जोरात तस्करी सुरू असून येत्या दहा वर्षात माहूर तालुक्यातील जंगलात एकही सागवण्याची झाड दिसणार नाही अशी परिस्थिती दिसत असून झालेल्या कामांची आणि वृक्षतोडीची चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी मनसेचे तालुका अध्यक्ष राजू पवार यांनी केली.

COMMENTS