मुंबई दि.३:चित्रकार,संगीतकार आणि लेखक म्हणून तिन्ही जबाबदाऱ्यांची लिलया यशस्वीपणे निभावून नेणारे लेखक मनोहर ठाकूर यांनी अत्यंत परिश्रमांती कर्णाच्या जीवनावर लिहिलेली 'अभेद्य' कादंबरी पूर्णत:साहित्य मूल्यांची जपणूक करणारी आहे.दुर्दैवाने त्यांचे निधन झाले असले तरीही शेवट पर्यंत वाचकांची उत्कंठा टिकवून ठेवणारी ही कलाकृती मरणोत्तरही त्यांना अमरत्व देईल,असा विश्वास या कादंबरीच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना मराठी साहित्यिकांनी व्यक्त केला.
मुंबईतील कोमल प्रकाशनने प्रकाशित केलेल्या मनोहर ठाकूर लिखित ५४२पृष्ठांच्या "अभेद्य"या पौराणिक कादंबरीचा प्रकाशन सोहळा चेंबूरच्या गांधी मैदानाजवळील बाल विकास संघ सभागृहात नुकताच पार पडला.श्रीमती वासंती आणि मयुरेश मनोहर ठाकूर यांनी
हा प्रकाशन सोहळा आयोजित केला होता.समारंभाला अकोला प्रशिक्षणालयाचे व्याख्याते सतीश फूड के,मुंबईतील प्रसिद्ध लेखिका प्रतिभा सराफ आणि ज्येष्ठ कथाकार काशिनाथ माटल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
महाभारतातील पराक्रमी परंतु नियतीचा शिकार ठरलेल्या कर्णाच्या जीवनावर आधारीत ही कादंबरी आहे.
सतिश फडके या कादंबरीवर प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना म्हणाले,महाभारताचे कथासार वाचतांना जया पेक्षा पराजय आणि माना पेक्षा अपमान वाट्याला आलेलं कर्णाचं व्यक्तिमत्त्व आपल्याला जवळचं का वाटतं?कारण एवढं सारं होऊनही एक योध्दा म्हणून तो शेवट पर्यंत लढत राहिला.या सा-या गोष्टीचा सखोल अभ्यास करून मनोहर ठाकूर यांनी 'अभेद्य' कादंबरी लिहिली.म्हणूनच ती निश्चितच मराठी साहित्यात आपले वेगळे स्थान निर्माण करील.
भारती सराफ म्हणाल्या,वाचकाला शेवटच्या क्षणापर्यंत वाचनात खिळवून ठेवणारी ही कादंबरी आहे. पुस्काच्या ब्लरमध्ये कथालेखक काशिनाथ माटल यांनी म्हटले आहे,लेखकाला अनंत काळ ही कादंबरी समाधान देत राहिल,हे विधान अचूक आणि सूचक आहे.
काशिनाथ माटल म्हणाले, राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने 'कला' विभागातून देण्यात आलेल्या,आंबेकर श्रम गौरव पुरस्काराचे मानकरी ठरलेले, मनोहर ठाकूर यांच्या कडून एक उत्कृष्ट पौराणिक कादंबरी
लिहिली गेलीय,या गोष्टीने एकार्थाने पुरस्काराचे महत्त्व जतन झाल्या सारखे आहे!त्यांनी आपल्या पहिल्या आणि शेवटच्या लेखनीतून हे अमरत्व सिध्द केले ,ही गोष्ट विसरता येणार नाही.
या प्रसंगी मनोहर ठाकूर यांच्या कन्या रोहिणी पाटील आपल्या मनोगतात म्हणाल्या,अनेक संकटांना सामोरे जात त्यांनी कादंबरी लिहून आपला ध्यास पूर्णत्वाला नेला आहे.या प्रसंगी कोमल प्रकाशचे गुरु शेट्ये, विक्रांत परब यांचा विशेष गुणगौरव करण्यात आला. *****

COMMENTS