*आंबुलगा सज्जाचे तलाठी कार्यालय मुखेड शहरात शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होते जोरात .
नांदेड
मुखेड तालुका सर्वात मोठा डोंगराळ व माळरान भाग म्हणून ओळखला जातो. त्यामुळे कामगार वर्ग याठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. ह्या कामगार जनतेला आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी व शेतीविषयक लागणारी कागदपत्रे काढण्यासाठी आंबुलगा सज्जाचे तलाठी यांच्याकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक होत आहे. आंबुलगा सज्जाचे तलाठी कार्यालय हे आंबुलगा येथे नसुन मुखेड मध्ये जोमात चालु आहे. आंबुलगा सज्जाचे तलाठी तालुक्याच्या ठिकाणी आपली राजधानी सिंहासन मांडून बसले आहेत. तेथून आंबुलगा सज्जाचा कारभार पाहतात. त्यामुळे गरीब जनतेची मोठ्याप्रमाणात हेळसांड , व आर्थिक पिळवणूक होत आहे. आंबुलगा सज्जाचे तलाठी मुखेड येथील खाजगी कार्यालयात आंबुलगा सज्जा अंतर्गत येत असलेल्या शेतकऱ्याच्या कामासाठी एक विशिष्ठ ठराविक भाव ठेवल्याची जनतेत चर्चा आहे. सातबारा फेरफार १५००० रुपये , सातबारा बोजा कमी करणे ५०० रुपये, वारसाआधारे फेर २०,००० रुपये, अशी फी तलाठी यांच्या खाजगी कार्यालयात शेतकऱ्याकडून वसूल करून आर्थिक पिळवणूक केली जात आहे. पैसे नाही दिले तर तलाठी संपर्क क्षेत्राच्या बाहेर असतो. त्यामुळे आंबुलगा येथील तलाठी सज्जा असून खोळंबा, नसून अडचण अशी दयनीय अवस्था आंबुलगा तलाठी सज्जाची झालेली आहे. या सलाईनवर असलेल्या तलाठी सज्जाकडे वरिष्ठ अधिकारी कधी लक्ष देतील का ? असा प्रश्न येथील शेतकऱ्यांमध्ये पडला आहे. अशा मुजोर तलाठ्यामुळे शेतकऱ्यांना विनाकारण तालुक्याच्या ठिकाणी हेलपाटे मारावे लागत आहेत. शेतातील कामे सोडून शेतकऱ्यांना तालुक्याच्या ठिकाणी जावे लागत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी आंबुलगा (बु) येथील तलाठी सज्जाची चौकशी करून तलाठ्याला मुख्यालयी राहण्याचे बंधनकारक करावे अशी मागणी नागरिकांतुन होत आहे.

COMMENTS