मुंबई दि.७: मुंबईतील गिरण्या कमी होत आल्या तरी गं.द. आंबेकरजींचा विधायक विचार कदापि थांबणार नाही,असे प्रतिपादन सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी येथे आंबेकर स्मृती सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी काढले.
राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे आद्य संस्थापक कामगार महर्षी गं.द.आंबेकर यांच्या ५८ व्या स्मृती प्रित्यर्थ स्मृती सप्ताह साजरा करण्यात येत आहे, याआंबेकर स्मृती सप्ताहाचे उद्घाटन सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या हस्ते आज दीपप्रज्वलनाने पार पडले.परेलच्या मजदूर मंदीलमध्ये हा उद्घाटन सोहळा पार पडला.आंबेकर यांनी आपल्या कामातून विधायक चळवळीचा पाया रचला.त्यातून कामगारांचा सर्वांगिण विकास घडवून आणला,असेही गोविंदराव मोहिते आपल्या भाषणात म्हणाले.
आंबेकर स्मृती सप्ताहात विविध क्रीडा स्पर्धा तसेच सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.हा उपक्रम गेली अनेक वर्षे मुंबईत राबविण्यात येत आहे.
परेलच्या टाटा मिलमध्ये युनिकेअर हेल्थ सेंटरच्या सौजन्याने, आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करणाऱ्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या हस्ते आज पार पडले.एनटीसीचे वरिष्ठ अधिकारी किशोर पवार,कुणाल महाजन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.आरोग्य शिबीराचे संयोजन तनुजा सोनावणे यांनी केले.या प्रसंगी गोविंदराव मोहिते म्हणाले,आज अन्न,हवा,पाणी या मध्ये प्रदूषण वाढले आहे.त्याद्वारे होणा-या रोगांचा मुकाबला करण्यासाठी प्रतिकार शक्ती वाढवावी लागेल!
सप्ताहातील विविध स्पर्धा आणि उपक्रम अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर यांच्या पुढाकाराने सुरु असून खजिनदार निवृत्ती देसाई ,उपाध्यक्ष रघुनाथ आण्णा शिर्सेकर, बजरंग चव्हाण, सुनिल बोरकर, सेक्रेटरी शिवाजी काळे आदी हा स्मृती सप्ताह यशस्वी करण्यासाठी सहकार्य करीत आहेत.*****

COMMENTS