नांदेड दि. 26.
या कार्यक्रमाची सुरुवात मा. नरेंद्र चव्हाण यांच्या गीत गायनाने झाली.
त्यानंतर मा निरंजना उर्फ स्वाती चव्हाण यांनी सुनना ध्यान या ध्यानाचे महत्त्व स्पष्ट केले आणि ते ध्यान करून घेतले. त्यानंतर स्वामी आनंद सुरेश यांनी ओशो प्रणित विविध ध्यान प्रकार करून घेतले.
येथील ओशो आश्रमाचे प्रमुख स्वामी गोपाल भारती यांनी ध्यानाचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाच्या शेवटी नृत्य आणि संगीत यांच्या तालावर सेलिब्रेशन करण्यात आले आणि अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमात अनेक ओशो प्रेमींनी भाग घेतला. या कार्यक्रमासाठी सर्वश्री नरेंद्र चव्हाण, ओमजी गिल्डा,शोभना वाघमारे,सुहास पाटील,सुरेश जोंधळे, सुरेश धूत, साक्षी धूत, आनंद मुदगलकर, किरण सोनकांबळे, डॉक्टर अनघा, नवीन भाई ठक्कर, हरीश नाथानी,अजय चव्हाण आदींची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वामी बोधी जागरण उर्फ प्रा. अजय गव्हाणे यांनी केले. कार्यक्रमाचा आयोजना साठी मा निरंजना,स्वामी प्रेम प्रशांत, मा प्रेम सुगंधा, निसर्ग चव्हाण, स्वामी गुरुमुख भारती आदिनी सहभाग घेतला.

COMMENTS