परभणी (. . ) महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशन मान्यतेने दि. 2 ते 6 डिसेंबर दरम्यान डेरवण रत्नागिरी येथे झालेल्या टेबल टेनिस राज्य अजिंक्यपद स्पर्धेत परभणी जिल्हा हौशी टेबल टेनिस संघटनेच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली .त्यात आद्या महेश बाहेती हिने आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत अंतिम फेरीत खेळत रौप्यपदक पटकावले. उप-उपांत्य पूर्व सामन्यात मुंबई उपनगरच्या सारा रायमा वर (7-11, 11-6, 12-10,13-11) 3-1 असा विजय मिळवत उप-उपांत्य फेरी गाठली. उपांत्य पूर्व सामन्यात मुंबई उपनगरच्या पलक झंवर वर ( 11-9, 11-8,16-14) 3-0 असा विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली. उपांत्य सामन्यात मुंबई उपनगरच्या त्रिशा लुबडे वर ( 11-4, 9-11,19-17, 11-8) 3-1असा विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरी खेळत तीने रौप्यपदक पटकावले.
तसेच शरयू माधव टेकाळे हिने दुसऱ्या उप उपांत्य पूर्व सामन्यात मुंबई उपनगरच्या वेदिका जैस्वाल वर (8-11, 11-5, 8-11,11-8) 3-2असा विजय मिळवत उप उपांत्य फेरी गाठली. शरयूला 2 रे मानांकन असणाऱ्या मुंबई उपनगरच्या मायरा सांगलीकर कडून 3-0 असा पराभव पत्करावा लागला. दोन्हीही खेळाडू स्कॉटिश अकॅडमी या शाळेच्या विद्यार्थिनी आहेत.
वरील सर्व खेळाडू जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी, क्रीडा व युवक सेवा संचलनालय म.रा.पुणे व भारतीय खेळ प्राधिकरण (साई) यांच्यामार्फत चालणाऱ्या खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्र परभणी येथे प्रशिक्षक चेतन मुक्तावार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतात.तसेच या खेळाडूंना विजय अवचार, अजिंक्य घन, तुषार जाधव,सुरज भुजबळ, रोहित जोशी, विशाल मेहता, शिवप्रसाद कदम,गौस खान पठाण, चेतन सुरवसे, विक्रम हत्तेकर, निखील झुटे यांनी सरावासाठी मेहनत घेतली.
या कामगिरीबद्दल जिल्हा क्रीडाधिकारी नरेंद्र पवार, राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे, शैलेंद्रसिंग गौतम, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष समशेर भैय्या वरपुडकर, कार्याध्यक्ष डॉ.माधव शेजुळ , जिल्हा सचिव संतोष सावंत, जिल्हा सचिव गणेश माळवे, डी.पी.पंडीत, केशव शिंदे पदाधिकारी, वरिष्ठ खेळाडू,पालक यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

COMMENTS