नवी मुंबईत सानपाडा येथे आधार कार्ड नोंदणी शिबीर*


नवी मुंबईत सानपाडा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शाखा ७९, महिला आघाडी, युवा सेनेच्या वतीने व शाखाप्रमुख बाबाजी महादेव इंदोरे यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांच्या सेवेसाठी ज्येष्ठ नागरिक शाळेतील पालक वर्ग व सानपाडा नागरिकांच्या मागणीस्तव नवीन आधार कार्ड नोंदणी तसेच आधार कार्ड दुरुस्ती शिबिराचे आयोजन १ डिसेंबर ते १३ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी १० ते ५ या दरम्यान शिवसेना शाखा ७९, त्रिवेणी गॅलेरीया, शॉप नंबर १४, सेक्टर ८, डॉ. पाकळे हॉस्पिटलच्या जवळ, सानपाडा, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी उपजिल्हाप्रमुख मिलिंद सुर्यराव, शाखाप्रमुख अजय पवार, सानपाडा जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मारुती कदम, उपाध्यक्ष विठ्ठल गव्हाणे, मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे प्रसिद्धीप्रमुख व मराठा विकास मंडळाचे सहसचिव मारुती विश्वासराव, शिवसेनेचे उपविभाग प्रमुख चांदभाई पटेल, सानपाडा येथील सामाजिक कार्यकर्ते रणवीर पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.

आधार शिबिरात नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होत असून त्यांच्या कडून बाबाजी इंदोरे दांपत्याचे कौतुक होत आहे. सतत जनतेच्या आवश्यक गरजांची कामे विविध उपक्रमांतून होत असून खऱ्या अर्थाने समाजकारण हे शिवसेना शाखेतून होत असतात, या बाबत लोक समाधान व्यक्त करत आहेत.

आपला 

मारुती विश्वासराव

टिप्पण्या