*स्व.गं.द.आंबेकर चषक:राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा शुक्रवारी तर शुटिंग बॉल स्पर्धा रविवार पासून!*

  


    मुंबई दि.६:यशस्वी अमृतमहोत्सवीवर्ष संपन्न करणा-या राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने येत्या शुक्रवार दि.९ ते १२ डिसेंबर पर्यंत श्रमिक जिमखाना,ना.म.जोशी मार्ग येथे व्यावसायिक पुरुष व स्थानिक महिला गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. दोन्हीं स्पर्धेत १२-१२ संघ भाग घेणार आहेत.दोन्ही गटातील अंतिम विजेत्या संघांना चषकासह प्रत्येकी ५० हजार रू. तर अन्य उपविजेत्या संघानाही पारितोषिकाने गौरविण्यात येईल. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आणि मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने स्पर्धा पार पडतील 

       रविवार दि.११रोजी सकाळी ९नंतर दिवसभर शिवनेरी क्रीडांगण, शिंदेवाडी-दादर येथे राज्यस्तरीय शुटिंग बॉल स्पर्धा पार पडतील.स्पर्धेत सुमारे १६ नामवंत संघानी भाग घेतला आहे.

   राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या पुढाकाराने गेल्या २५ वर्षांपेक्षा अधिक काळापासून या स्पर्धेचे आयोजन करुन क्रीऊगुणांना उत्तेजन देण्यात येत आहे.

    सर्वश्री उपाध्यक्ष सुनिल बोरकर,कृष्णा तोडणकर, प्रकाश भोसले,अनिल पाटील कबड्डी स्पर्धांच्या आयोजनात सहभागी आहेत.तर शुटिंग बॉल स्पर्धा शुटिंग बॉल असो.चे अध्यक्ष श्याम सावंत, सेक्रेटरी दीपक सावंत,अशोक चव्हाण,चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्श नाखाली पार पडणार आहेत.

 ------------------------

 *उद्या.७ डिसेंबर पासून रामिम.संघ,परेल येथे स्मृती सप्ताहाचा सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडणारआहे.*

टिप्पण्या