शासनाने कलावंतांच्या मानधनात वाढ करावी!शाहिरी मंचच्या सोहळ्यात शाहिरांच्या भावनिक मागणीला साद

    मुंबई दी.२९ :आपले संपूर्ण जीवन कलेसाठी व्यतीत करणाऱ्या कलावंतांना शेवटचं आयुष्य सुखी समाधानाने जगता यावे यासाठी त्यांच्या मानधनात महिन्य...


 

  मुंबई दी.२९ :आपले संपूर्ण जीवन कलेसाठी व्यतीत करणाऱ्या कलावंतांना शेवटचं आयुष्य सुखी समाधानाने जगता यावे यासाठी त्यांच्या मानधनात महिन्याच्या वेतना इतकी तरी सरकारने वाढ करावी,असे विचार राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी येथे बोलतांना मांडले. 

   मुंबईत वैविध्यरुपी कार्यक्रमाने लोककलेला संजिवनी देण्यासाठी गेली चार वर्षे अविरत धडपडणाऱ्या शाहिरी लोक कलावंत मंचचा ५ वा वर्धापनदिन बुधवारी दादरच्या शिवाजी मंदिर मध्ये संपन्न झाला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गोविंदराव मोहिते बोलत होते. शिवसेनेचे उपनेते अमोल किर्तीकर यांनी पाचव्या पर्वाचा शुभारंभ श्रीफळ वाढवून केला.लोक कलेला आता लोकाश्रय मिळावयास हवा,समाजाचे ते कर्तव्यच ठरेल,असे अमोल किर्तीकर यांनी प्रतिपादन केले.

   कार्यक्रमाला चित्रपट नृत्य दिग्दर्शिका किशू पाल,मराठी चित्रपट अभिनेते सुशांत शेलार,मनसेच्या वाहतूक विभागाचे अध्यक्ष संजय नाईक,नगरसेवक रमाकांत रहाटे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रवीण खामकर,बीएमसी सुरक्षा दल उपप्रमुख मंगेश मुणगेकर,आंतरराष्ट्रीय हिंदु परिषदेचे दक्षिण मध्य मुंबई अध्यक्ष उमेश पांडे,टॅक्सी-रिक्षा विभाग प्रमुख सुनिल बोरकर,शाहीर दत्ता ठुले,शाहीर विष्णू गिलबिले आदी विविध क्षेत्रातील मान्यवर त्या वेळीउपस्थित होते.

  शाहिरी लोक कला मंचला सातत्याने प्रोत्साहन देणारे राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष, शिवसेनेचे उपनेते आमदार सचिनभाऊ अहिर यांनी खास नागपूरहून कलावंतांसाठी शुभेच्छा दिल्या.     

    मंचचे सरचिटणीस संस्थेचे सर्वेसर्वा शाहीर मधू खामकर यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले,आजही अनेक कलावंतांची उपजिविका कलेवर चालते!शाहिरीकला ज्येष्ठां कडून युवा शाहिरांकडे सोपविण्यासाठी,शाहिरी मंचाची स्थापना करण्यात आली.

   पाचव्या शाहिरी लोक रंगाच्या सादरीकरणाचे खास आकर्षण जालन्याचे यूवा शाहीर रामानंद उगले ठरले.शाहीर साबळे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे.शाहीर साबळे यांच्या जीवनावर लवकरच प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटात शाहीर साबळे यांच्यावर चित्रित होणारी गाणी शाहीर रामानंद उगले यांनी गायली आहेत. त्यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.या प्रसंगी युवा शाहीर रामानंद उगळे यांनी लोकरूची गाणी सादर करून कार्यक्रमात चांगलाच रंग भरला.

     दूसरे पाहूणे शाहीर पोलिस निरीक्षक प्रवीण फणसे यांनी छत्रपति शिवरायांवरील पोवाडे सादर केले.अवघ्या पाच- सहा वर्षांचा बाल कलाकार वीर प्रवीण फणसे याने शिवरायांवर तर कन्या शर्वरी फणसे हिने बोबड्या शब्दातील "नयबा किसना.." हे विठ्ठल उमप यांनी आपल्या आवाजाने अमर केलेलं पारंपरिक गाणे गाऊन प्रेक्षकांचा नाट्यगृहात टाळ्यांचा अक्षरश: पाऊस पाडला!पोलीस अधिकारी आणि शाहीर फणसे कुटुंबीयांचा संस्थेचे खजिनदार आणि कार्यक्रमाचे निर्माते महादेव खैरमोडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

    ख्यातनाम पार्श्वगायीका सुलोचना यांचे नुकतेच निधन झाले.त्यांनी आपल्या ठसकेदार आवाजात गाऊन अजरामर केलेली," कळीदार.." हे गाणे गीता गोलांबरे,तरुण पणाला.. धनश्री पवार आणि फड संभाळ..हे गाणे लता देवरुखकर या गायीकेंनी तेवढ्याच ताकदीने गायीली.त्यावर स्नेहलता कांबळे,आश्वीनी कारंडे आणि तेजस्विनी वाडेकर यांनी अप्रतिम नृत्य करुन,स्व.सुलोचना चव्हाण यांना ख-या अर्थाने भावांजली वाहिली.

  त्याशिवाय कोळी आदी पारंपरिक गितांवर नृत्याविष्कार करून कलाकारांनी ससिकांच्या टाळ्या घेतल्या 

    शाहीर खामकर, शाहीर सुखदेव, शाहीर निलेश जाधव,धीरज पारकर,विराज साळवी आदींनी जूनी-नवी शाहिरी गिते गाऊन कार्यक्रम मंत्रमुग्ध केला.

   विनोदमूर्ती राम काजरोळकर, कमलाकर पाटील यांनी बातावणी मध्ये विनोदी भूमिकेतून धमाल उडवून दिली.गौळण या विनोदी प्रसहनात सुरेखा काटकर, माणिक मयेकर, तसेच चंद्रकांत तांबोळी यांनी विनोदी अभिनयातून कार्यक्रम आकर्षक केला.

   संपूर्ण कार्यक्रमाचे संगीत संयोजन संगीतकार मनोहर गोलांबरे यांनी तर नृत्य दिग्दर्शन गणेश कारंडे यांनी केले आहे. 

   सर्वश्री सुनिल मेहतर,चंदू पांचाळ, डॉ.किशोर खुशाले, ज्ञानेश्वर ढोरे, उज्वल वळंजू, आदित्य कावळे,अशोक वाकजे यांनी आपल्या उत्कृष्ट वादनातून लोकरंगात चांगलाच रंग भरला.

   नंदू खोत, रविंद्र पारकर,मनोहर टाकळे,अरूण थोरात, संदीप खामकर, विशाल गिलबिले यांचे सहकार्य महत्त्वाचे ठरले. 

   माधूरी काळभोर यांनी सूत्रसंचालन केले.लेखक काशिनाथ माटल यांनी समन्वयकाची जबाबदारी सांभाळली.***

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel