नांदेड प्रतिनिधी जिल्हा परिषद हायस्कूल वाघी ता जि नांदेड येथे माध्यमिक शिक्षक पदावर कार्यरत असलेले संजय शेळगे यांना महाराष्ट्र शासनाचा 20...
नांदेड प्रतिनिधी
जिल्हा परिषद हायस्कूल वाघी ता जि नांदेड
येथे माध्यमिक शिक्षक पदावर कार्यरत असलेले संजय शेळगे यांना महाराष्ट्र शासनाचा 2021-22 या शैक्षणिक वर्षाचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनी गेल्या 22 वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात ज्ञानदानाचे काम करत असून एक हाडाचा विद्यार्थीभिमुख व विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. गणित विषयाचे राज्यस्तरीय सुलभक असून विविध नवोपक्रम स्पर्धेत राज्यस्तरावर प्राविण्य मिळवले आहे. संकल्प शिष्यवृत्ती , कॉपी मुक्त अभियान, मिशन आपुलकी इ. सहशालेय उपक्रमात विशेष प्राविण्य मिळवले आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

COMMENTS