उदगीर,
श्री छत्रपती शाहू महाराज सैनिकी विद्यालयात विजय दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी विद्यालयाचे कमांडंट कमांडर बी. के. सिंह यांच्या हस्ते विद्यालयातील अमर जवान स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करुन शहीदांना अभिवादन करण्यात आले. तर विद्यार्थ्यांनी सलामी शस्त्राच्या माध्यमातून उत्कृष्ट संचलन करुन शहीदांना अभिवादन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कमांडंट कमांडर बी. के. सिंह यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हटले,
दरवर्षी देशाच्या सैनिकांच्या शौर्याचे स्मरण आणि सन्मान करण्यासाठी भारतात 16 डिसेंबर रोजी विजय दिवस साजरा केला जातो. 1971 च्या युद्धात भारताचा पाकिस्तानवर विजय साजरा केला जातो, ज्यामुळे बांगलादेशची निर्मिती झाली. हा दिवस बांगलादेशमध्ये त्याच तारखेला विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.
पूढे बोलताना ते म्हणाले, भारतीय सैनिकांनी शौर्य व पराक्रम दाखवून पाकिस्तानवर विजय मिळविला. सैनिक हा चोवीस तास देशाची सेवा करतो. त्यांच्यामुळेच आज आपण सुरक्षित आहोत, याची जाणीव आपण ठेवली पाहिजे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी मुस्कावाड यांनी केले तर आभार नागेश पंगू यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बी टी पाटील, सुनील महिंद्रकर,सुधीर गायकवाड, विजय कावळे यांनी परिश्रम घेतले.

COMMENTS