प्रसिध्दीसाठी: *गं.द.आंबेकर-मा.शरदचंद्र पवार कबड्डी चषकावर अखेर भारत पेट्रोलियम,शिवशक्तीने उमटवली विजयाची मोहर

    मुंबई दि.१६ : राष्ट्रीय मिल मजदूर संघाद्वारे गं.द.आंबेकर चषकासाठी आयोजित करण्यात आलेल्या व्यवसायिक गट पुरुष आणि महिला गट राज्यस्तरीय कबड...

 




  मुंबई दि.१६ : राष्ट्रीय मिल मजदूर संघाद्वारे गं.द.आंबेकर चषकासाठी आयोजित करण्यात आलेल्या व्यवसायिक गट पुरुष आणि महिला गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत,भारत पेट्रोलियम आणि शिवशक्ती महिला संघाने अखेर उमटविली जेतेपदाची मोहर! तेव्हा श्रमिक जिमखाना येथे तुडूंब भरलेल्या क्रीडा रसिकांनी दोन्ही विजयी संघावर अक्षरशः टाळ्यां चा वर्षाव केला.


    भारत पेट्रोलियमचा रिशांक देवाडीगा पुरुष स्पर्धेत तर शिवशक्तीची पूजा यादव महिला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले.

    ना.म.जोशी मार्गावरील पुरुषांच्या अंतिम लढतीत भारत पेट्रोलियमने बडोदा संघावर२७-१७ अशी मात करुन अंतिम विजय हशिल केला. शिवशक्ती महिला संघाने डॉ.शिरोडकर स्पोर्टसवर ३८-१६ अशी मात करून अंतिम विजयाचे शिखर गाठले!

    त्यापूर्वी पुरुषांच्या उपांत्य सामन्यात भारत पेट्रोलियमने मध्य रेल्वे(विभाग) संघाचा ४०-११ असा पराभव केला.

     तर बॅंक ऑफ बडोदाने न्युइंडिया एन्शुरन्सचा ३५-२९ असा पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला.

   महिलांमध्ये शिवशक्तीने महात्मा गांधी स्पोर्ट्सचा ४७-१८ असा, तर डॉ.शिरोडकरने अमरहिंदचा२९-११असा धुवांधार खेळीत पराभव करीत अंतिम फेरी गाठली.

    बॅंक ऑफ बडोदाचा नितीन देशमुख,साहिल राणे हे खेळाडू पुरूषात सर्वोत्कृष्ट चढाई व पकडचे खेळाडू ठरले..

    डॉ.शिरोडकरची मेघा कदम व शिवशक्तीची पौर्णिमा जेधे महिला स्पर्धेत उत्कृष्ट चढाई आणि पकडचे मानकरी ठरले.

   बक्षीस वितरण राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते आदींच्या हस्ते पार पडले.या वर्षिही आंबेकर चषका बरोबर मा.शरश्चंद्र पवार चषक विजेत्यांना प्रदान करुन क्रीडा प्रेमी शरदचंद्रजी पवार यांच्या विषयी नितांत आदर व्यक्त करण्यात आला.त्या दिवशी मा.शरद पवार यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.रामिम संघ व महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी बक्षीस वितरण सोहळ्यात सहभाग घेतला.क्रीडा प्रमुख उपाध्यक्ष सुनिल बोरकर यांच्या नियोजना खाली स्पर्धा पार पडल्या तर त्यांना कबड्डी प्रशि‌क्षक कृष्णा तोडणकर, प्रकाश भोसले,अनिल पाटील आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.स्पर्धा निरिक्षक शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त मिनानाथ धानजी आदी मान्यवरांनी स्पर्धेला चांगलाच सहकार्याचा हात दिला.**

COMMENTS

[विशेष न्युज]

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel