मुंबई दि.१३: कामगारावरील अन्यायाचा कहर झाला असून आता त्या विरुद्ध वज्रमुठ उगारण्याची गरज आहे,असे प्रतिपादन युवासेना नेते आदित्य ठाकरे यांनी केले तर संघटना वेगवेगळ्या विचाराच्या असल्या तरी आता कामगारांच्या अस्तित्वाच्या प्रश्नावर सूवर्णमध्य साधून लढा उभारावा लागेल, असे विचार कॉग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी येथे काढले.
राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने कामगार महर्षी गं.द.आंबेकर यांचा ५८ वा स्मृती दिन आज शिवाजी मंदिर मध्ये संपन्न झाला. या औचित्याने आंबेकर जीवन गौरव पुरस्कार सिटूचे नेते कॉ.डी.एल कराड यांना तर अन्य पाच मान्यवरांना आंबेकर श्रम गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यातआले.समारंभाच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर होते.
प्रारंभी गं.द आंबेकर यांच्या प्रतिमेला पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.प्रास्तविक भाषणात सरचिटणीस गोविंदराव मोहिते म्हणाले,आंबेकरजींनी दाखवलेली दिशा आजच्या घडीला मार्ग दर्शक ठरेल.
केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणावर कडाडून हल्ला करून माजी पर्यीवरण मंत्रीआदित्य ठाकरे म्हणाले,सुमारे सव्वा दोन लाख रोजगार निर्माण करणारे उद्योग बाहेर गेले.ते कोणत्या राज्यात गेले याचे मला काहीच वाटत नाही. पण ते महाराष्ट्रातून हिसकावून घेतले गेले याचेच दुःख होते आहे.आज विद्यार्थी शिकतो आहे.फिक्स टर्म योजनेतून त्याच्या पुढे निराशा निर्माण झाली आहे.परंतु नोक-या निर्माण होणार नसतील तर त्यांनी जायाचे कुठे?
लोकसभेत साडेतीन तासात २९ कायद्याचे चार कायद्यात रुपांतर करण्यात आले आणि ज्यांनी विरोध केला त्यांना बाहेर काढले गेले आणि चर्चेवीना बील संमत करण्यात आले,यावर सडकून टीका करताना बाळासाहे थोरात म्हणाले,हे कायदे कामगारांना गुलामगिरी कडे नेणारे आहेत.
यावेळी महाआघाडीच्या वतिने १७ तारीखेला जो सरकारच्या धोरणा विरूध्द मोर्चा काढण्यात येणार आहे,त्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.डॉ.डी.एल.कराड यांनी सत्कार मूर्तीच्य वतीने आभार मानले.
अध्यक्षस्थानावरून संघटनेचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर म्हणाले,आज पर्यंत एकही संप न करता युनीयन टिकविली आहे.परंतु कामगारांच्या हितासाठी संघर्षाची भूमिका कधीही सोडली नाही.त्यांनी आपल्या भाषणात संघटनेच्या ७५ वर्षाच्या वाटचालीचा आढावा घेतला.त्यांनी बंद एनटीसी गिरण्यांच्या प्रश्नावरही संघर्षाचा नारा दिला.
या प्रसंगी सिन्नरचे कामगार साहित्यिक किरण भावसार यांना साहित्यातून, कोल्हापूरचे श्यामराव कुलकर्णी यांना कामगार चळवळी तून,रायगडच्या एसटी वाहक शिल्पा काकडे यांना कला तर उस्मिनाबादच्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खोखोपटू सारीका काळे यांना क्रीडातून,तर औरंगाबादचे शुभाष लोमटे यांना सामाजिक क्षेत्रातून
गौरविण्यात आले.
संघटनेचे खजिनदार निवृत्ती देसाई, तसेच उपाध्यक्ष आण्णा शिर्सैकर यांचा अमृतमहोत्सवी वाढ दिवसाच्या औचित्याने ४० वर्षाच्या निष्ठामयी कामाचा मानपत्राने गुणगौरव करण्यात आला.समिर दाभोळकर यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.शाहिरी लोककला मंचाने शाहिरी कार्यक्रम सादर करून संघटनेच्या अमृतमहोत्सवी उत्सवाला शान आणली.सर्वश्री सरचिटणीस गोविंदराव मोहिते,उपाध्यक्ष बजरंग चव्हाण,सुनिल अहिर,सुनिल बोरकर, उत्तम गिते सेक्रेटरी शिवाजी काळे,राजनभाई लाड,संजय कदम, किशोर रहटे,साई निकम आदि पदिधिकारी त्यावेळी उपस्थित होते.***"


COMMENTS