*कामगार चळवळीत मानाचा ठरलेला गं.द.आंबेकर जीवन व श्रम गौरव पूरस्कार प्रदान सोहळा मंगळवारी शिवाजी मंदिरात !*

 मुंबई दि.११ : कामगार चळवळीत मानाचा आणि प्रतिष्ठेचा ठरलेला गं.द.आंबेकर जीवन व श्रम गौरव पुरस्कार प्रदान सोहळा 'स्व.आंबेकरजींच्या स्मृती...

 मुंबई दि.११ : कामगार चळवळीत मानाचा आणि प्रतिष्ठेचा ठरलेला गं.द.आंबेकर जीवन व श्रम गौरव पुरस्कार प्रदान सोहळा 'स्व.आंबेकरजींच्या स्मृतीदिनी' मंगळवार दि.१३ रोजी सकाळी ११ वाजता,शिवाजी मंदिरात मोठ्या थाटामाटात संपन्न होणार आहे.यंदाचे अमृतमहोत्सवी वर्ष असल्याने समारंभाला आगळे स्वरूप आले आहे.या समारंभाला आजी-माजी प्रतिनिधींनी तसेच कार्यकर्त्यांनी आवर्जून उपस्थित रहावे,असे संघटनेच्या नेत्यांनी आवाहन केले आहे.

    समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी कामगारमंत्री-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ,माजी मंत्री-युवासेना नेते आदित्य ठाकरे, आणि माजी मंत्री-कॉंग्रेसनेते बाळासाहेब थोरात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.समारंभाचे अध्यक्षस्थान संघटनेचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर भुषवतील.सरचिटणीस गोविंदराव मोहिते प्रारंभी प्रस्तावना करतील.

    या प्रसंगी सिटूचे लढाऊ कामगारनेते कॉं.डॉ.डी.एल. कराड(नाशिक)यांना गं.द.आंबेकर जीवन गौरव पूरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तर औद्योगीक क्षेत्रातील हिंद खेत मजदूर सभेचे राष्ट्रीय सरचिटणीस साथी सुभाष लोमटे यांना सामाजिक विभागातून,सिन्नर येथील ज्येष्ठ कामगार साहित्यिक किरण भावसार यांना साहित्यातून,कोल्हापूर-इचलकरंजीतून यंत्रमाग कामगारांचे नेते शामराव कुळकर्णी यांचा कामगार चळवळीतून,रायगड मधील एसटी वाहक कलावंत 'कुमारी शिल्पा काकडे यांचा कला विभागातून,उस्मानाबाद मधील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खोखो खेळाडू,अर्जून पुरस्कार विजेत्या सारिका काळे, यांना क्रीडा विभागातून सन्मानित करण्यात येणार असून या पाच नामवंताना गं.द आंबेकर श्रम गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

    पुरस्काराचे हे दहावे वर्ष आहे. शाल,श्रीफळ,स्मृती चिन्ह,मानपत्र आणि धनादेश असे या सत्काराचे स्वरूप आहे.

 ***

COMMENTS

[विशेष न्युज]

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel