मुंबई दि.१५: मोबाईल वरील व्हॉट्सॲपचा मोह टाळून वाचक संस्कृती वृद्धिंगत करणे गरजेचे आहे.भूतपूर्व राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी व्यक्तीमत्वाचा विकास करतांना वाचन संस्कृती जोपासण्याचे केलेले आवाहन आजच्या घडीला महत्त्वाचे आहे,
असे उद्गार राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस आणि ग्रंथालयाचे अध्यक्ष गोविंदराव मोहिते यांनी वाचक मेळाव्यात बोलतांना काढले.
राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या सार्वजनिक ग्रंथालय व वाचनालयाच्या वतीने मनोहर फाळके सभागृहात भूतपूर्व राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीच्या औचित्याने वाचक प्रेरणादिन संपन्न झाला.सर्वप्रथय संघटनेचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर यांनी समारंभाला दिलेला शुभसंदेश वाचून दाखविण्यात आला. त्यावेळी गोविंदराव मोहिते अध्यक्षस्थाना वरुन बोलत होते.तर प्रमूख पाहुणे म्हणून कामगार लेखक मनोहर धोत्रे आणि ज्येष्ठ रंगकर्मी के.राघवकुमार उपस्थित होते.प्रास्तविक संघटनेचे सर्वश्री निवृत्ती देसाई,अण्णा शशिर्सेकर, शिवाजी काळे, मारूती शिंत्रे आदी पदाधिकारी त्यावेळी उपस्थित होते.आंबेकर श्रमसंशोधनचे संचालक जी.बी.गावडे यांनी सूत्रसंचालन केले.प्रास्तविक संघटनेचे जनसंपर्क प्रमुख कथा लेखक काशिनाथ माटल यांनी केले
भूतपूर्व राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांनी भारताला अणुबॉम्ब समृद्ध देश बनविले, असे सांगून गोविंदराव मोहिते म्हणाले,वाचनाने माणसाचा आत्मविश्वास वाढून जीवनाची निश्चित दिशा कळते.
कामगार लेखक मनोहर धोत्रे यांनी आपल्या भाषणात वाचनाचे महत्व विशद करताना सांगितले, जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर वाचन संस्कृती माणसाचा विकास घडवते.तर लेखक काशिनाथ माटल यांनी सांगितले,वाचाल तर वाचाल,हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला मंत्र विसरून चालणार नाही.
राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या अमृतमहोत्सवी वर्षा निमित्त ४० गुणी वाचक सदस्यांना प्रशस्तीपत्र आणि पूस्तकभेट देऊन सन्मानित करण्यात आले.
ग्रंथपाल ममता घाडी,मेघना आसबे, श्रावणी पवार यांनी आपले विचार मांडले.उपस्थित अनेक वाचकांनी ग्रंथालय आणि वाचनालयाने वाचनाची गोडी लावुन जीवन सुखकर केले आहे, असे सांगितले.

COMMENTS