कृषि महाविद्यालय डोंगरशेळकी तांडा उदगीर येथील विद्यार्थी कृषिकन्या म्हणून ग्रामीण जागरुकता कार्यानुभव कार्यक्रम ( RAWE) आणि कृषि-औद्योगिक संलग्नता उप जल्हाधिकारीक्रम ( AIA ) या राज्यस्तरीय कार्यक्रमांतर्गत सुकणी येथे विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. या अनुषंगाने येथे घटसर्प आणि फर्या रोगाचे लसीकरणा चे आयोजन करण्यात आले. हा ग्रामीण जागरुकता कार्यानुभव कार्यक्रम ( RAWE) आणि कृषी-औद्योगिक संलग्नता उपक्रम ( AIA ) ङाॅ. ङी.एन. गोखले, संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता(कृषि), व.न.म.कृ., परभणी, ङाॅ. आर.पी. कदम, विस्तार शिक्षण विभाग, व.न.म.कृ., परभणी आणी कृषि महाविद्यालय लातूरचे कार्यक्रम समन्वयक ङाॅ. व्ही. बी.कांबळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.एम.पाटील, कार्यक्रम समन्वयक डॉ. एस.एन. वानोळे, कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. पी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीस वसंतरावजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन गावचे संरपच श्रीमतीआशाताई सोपान कणकुरे तसेच ग्रामसेवक श्री बी. एस.भांगे व प्रमुख पाहुणे मुख्याध्यापक पाटील सर यांच्या हस्ते करण्यात आले. या अनुषंगाने गावामध्ये कृषिकन्या स्नेहा वगरे,हर्षदा सावळे, प्रतिक्षा सूर्यवंशी, सुषमा वागधरे, श्राव्या तेलुगू यांनी लसीकरण विषयक जनजागृती केली. गावकऱ्यांना त्याबद्दल चे महत्व सांगितले
यावेळी पशुैद्यकीय तज्ञ डॉ. बी. बी.कांबळे यांनी मार्गदर्शन केले. लसीकरणा साठी शेतकरी गावातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS