सेलू प्रतिनिधी ता.१५ शनिवार.
सेलू शहरातील श्रीमती ल.ला.रा.नूतन कन्या प्रशाला स्व:सौ.दूर्गाताई द.कुलकर्णी स्मृती ग्रंथालय सेलू कडून भारताचे महान शास्त्रज्ञ मा. राष्ट्रपती भारतरत्न, डाँ.ए.पी.जे.अब्दूल कलाम यांच्या जयंती निमित्त वाचन प्रेरणा दिन ऊत्साहात साजरा करण्यात आला या वेळी प्रमूख पाहुणे सेलू ऊपजिल्हा अधिकारी अरूणा संगेवार, सौ.अल्का कोरडे, विलास कोरडे यांची उपस्थित होती,
या वेळी वाचनाने व्यक्तीच्या आत्मविश्वास वाढतो , सर्वांगीन विकास होतो, योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते, म्हणजेच वाचनाने मानवाच्या जिवनात सकारात्मक बदल होण्यास मदत होते असे प्रतिपादन सौ.अरूणा संगेवार व सौ.अलका कोरडे यांनी केले.
व्यासपीठा वर नू.वि.शि. संस्थेचे सचिव डॉ.व्ही.के.कोठेकर, उपजिल्हाअधिकारी अरूणा संगेवार,कुलस्वामिनी प्रतिष्ठान औरगाबादचे अध्यक्ष,तथा संचालक विलासजी कोरडे, सौ.अलका कोरडे, मुख्याध्यापिका संगिता खराबे, दत्तराव घोगरे, रोहीदास मोगल, यांची उपस्थित होती ,
कार्यक्रमाची सुरूवात प्रतिमा पूजनाने व पूजा महाजन यांच्या स्वागत गिताने झाली, या निमित्त ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले .मान्यावरांच्या हस्ते त्याचे उदघाट्न करण्यात आले.त्याच बरोबर वाचन प्रेरणा दिनानिमित्त "इवलेसे वेल वाचनाचे-वाढवू फुलू संस्काराचे" या उपक्रमात अग्निपंख या पुस्तकावर अतिशय सुंदर असे समीक्षात्माक विवेचन सादर केल्या बद्धल कोरडे यांनी कु.प्रतीक्षा मोगल, कु.उन्नती भोसीकर या विद्यार्थिनींना रोख रु.500/-प्रत्यक्ती देऊन त्यांचं कौतुक केले. त्याच बरोबर त्यांनी रु.2500/- ग्रंथ खरेदी साठी देणगी दिली.आमच्या संस्थेतील अनेक ग्रंथप्रेमी,वाचन प्रिय सहकारी बंधु-भगिनी प्रशालेच्या स्व.सौ.दुर्गाताई द.कुलकर्णी स्मृति ग्रंथालयास ग्रंथ भेट व नगदी रक्कम दिली त्याबद्दल प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. देणगीदारांची यादी वाचन .कैलास मलवडे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रथंपाल शिवाजी शिंदे यांनी केले.पाहुण्यांचा परिचय सौ.वैशाली चव्हाण यांनी केला.सर्व मान्यवरांनी वाचनाचे महत्व विषद करून सांगितले,कार्यक्रमांचे अध्यक्ष श्री व्ही.के.कोठेकर यांनी पुस्तके केवळ वाचू नयेत तर ते प्रत्येक्षात आयुष्यात उतरावीत असे प्रतिपादन केले आहे. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ.कीर्ती राऊत यांनी केले तर आभार भालचंद्र गाजांपूरकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी .सुहास देऊळगावकर, अनंत बोराडे,आदी शिक्षक -शिक्षकेत्तर बंधू भगिनींनी सहकार्य केले.

COMMENTS