मुंबई - महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदचे ग्रंथालय शिक्षक विभागातर्फे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन, वाचन प्रेरणा दिन २०२२निमित्ताने गुगल मीटवर वेबिनार आयोजित करण्यात आला होता. यु - ट्युब लिंकच्या माध्यमातुनही या वेबिनारचा लाभ महाराष्ट्रातील असंख्य शालेय ग्रंथपालांनी घेतला. या वेबिनारचा विषय होता *शाळा ग्रंथालय व्यवस्थापन* मार्गदर्शक व प्रमुख वक्ते होते *मा.डाॅ.मधुकरजी शेवाळे सर* प्रमुख, ग्रंथालय व माहीतीशास्त्र, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांनी याप्रसंगी मार्गदर्शन करताना नविन शैक्षणिक धोरण २०२० मध्ये सार्वजनिक व शालेय ग्रंथालयांची भूमिका महत्वाची असून माहितीच संप्रेषण करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे याकरिता शालेय ग्रंथालये ई-ग्रंथालयात रुपांतरित करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले आताच्या काळात शालेय ग्रंथालयांच्या व्यवस्थापनात येणाऱ्या अडचणी व त्यावर मात करण्याकरिता उपाययोजना याचें बहुमोल मार्गदर्शन याठिकाणी त्यांनी केले .
याप्रसंगी कार्यवाह श्री. जगदीश चित्ते,उपाध्यक्ष,श्री. तानाजी कांबळे , कार्याध्यक्ष श्री. विनोद भंगाळे ,अध्यक्ष श्री. विलास सोनार , उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ.मनिषा राजन कडव यांनी केले. तर प्रमुख वक्त्यांची ओळख सौ. सायली देवळेकर यांनी करवून दिली. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, ग्रंथालय शिक्षक विभाग सर्व पदाधिकारी यांचे ही वेबिनार यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य लाभले.

COMMENTS