किनवट/माहूर : नक्षलग्रस्त व आदिवासीबहूल भाग अससेल्या किनवट येथे ग्रामीण पोलीस मुख्यालय सुरू करण्याची मागणी आ. केराम यांनी राज्याचे उपमुख्...
किनवट/माहूर : नक्षलग्रस्त व आदिवासीबहूल भाग अससेल्या किनवट येथे ग्रामीण पोलीस मुख्यालय सुरू करण्याची मागणी आ. केराम यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांचेकडे लेखी निवेदनातून मागणी केली असून किनवट व माहूर तालुक्यातील वाढत्या गुन्हेगारीसोबतच नागरीकांच्या सोईसुविधांसाठी किनवट येथे ग्रामीण पोलीस मुख्यालय सुरू करणे अत्यंत गरजेचे असल्याचेही निवेदनातून म्हटले आहे..
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना दि. ३० सप्टेंबर रोजी किनवट/माहूरचे आमदार भिमरावजी केराम यांनी दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की, नांदेड जिल्ह्यातील किनवट व माहूर हे तालुके भौगोलिकदृष्ट्या विस्ताराने मोठे असून यातील बहुतांश भाग हा नक्षलग्रस्त आदिवासी प्रवण क्षेत्रात मोडतो. त्यातच तेलंगणा व विदर्भ सिमेवरील हे क्षेत्र आहे. मुख्य म्हणजे किनवट व माहूर पासून जिल्हा मुख्यालय हे सुमारे १५० ते १७५ कि.मी. अंतरावर असल्याने या भागातील जनतेस कामानिमित्त नांदेडला ये-जा करणे अत्यंत कठीण व कसरतीचे होत आहे.
विशेष म्हणजे किनवट येथे यापुर्वी अतिरिक्त पोलीस अधिक्षक कार्यालय, कार्यान्वित होते. परंतु ते बंद करण्यात आले असून सद्यपिस्थितीतील वाढती लोकसंख्या व गुन्हेगारी प्रवृत्ती लक्षात घेता या भागातील जनतेच्या सुरक्षेच्या तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने किनवट येथे ग्रामीण पोलीस मुख्यालयाची मागणी होत आहे. त्यामुळे या मागासलेल्या आदिवासी तालुक्यास राज्यातील गडचिरोलीच्या धर्तीवर सुरक्षा व विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनुसुचीत क्षेत्र 'खासबाब म्हणुन किनवट येथे ग्रामीण पोलीस मुख्यालय सुरु
करण्यासाठीचे आदेश संबधितांना देवुन सहकार्य करण्याची मागणी आ. भिमरावजी केराम यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे..

COMMENTS